Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या बैठकीतून उदयनराजे निघून गेले, तर अजितदादांच्या आमदाराची दांडी; नेमकं काय घडलं?

Satara Lok Sabha Election 2024 : महायुतीतील सातारा लोकसभा मतदारसंघातील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
udayanraje bhosale ajit pawar
udayanraje bhosale ajit pawarsarkarnama

महायुतीच्या साताऱ्यातील पहिल्याच बैठकीकडे नेत्यांनी पाठ फिरविली. बैठकीस येण्यास पदाधिकाऱ्यांना उशीर झाल्याने खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) निघून गेले, तर अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील ( Makrand Patil ) उपस्थित राहिले नाहीत. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी सारवासारव करत महत्त्वाच्या बैठका असल्याचे कारण सांगून गेल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीतील सातारा लोकसभा मतदारसंघातील ( Satara Lok Sabha Election 2024 ) घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी ( 2 एप्रिल ) पालकमंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भेासले ( Shivendraraje Bhosale ), आमदार महेश शिंदे ( Mahesh Shinde ), भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, अमित कदम, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत पाटील, सुरभी भोसले, शारदा जाधव, अशोक गायकवाड, सुनील काटकर, पंकज चव्हाण, काका धुमाळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीची बैठक झाली. राज्यातील नेत्यांकडून येणाऱ्या आदेशाचे तंतोतंत पालन सर्व पक्षांनी करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या आठ एप्रिलपासून विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ता मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात ठाण्यातून होत आहे. सातारा लोकसभेचे मेळावे हे कराड येथून सुरवात होईल. प्रत्येक विभागाचा एक मेळावा होणार आहे."

महायुतीच्या बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याबद्दल विचारले असता, शंभूराज देसाईंनी म्हटलं, "खासदार उदयनराजे भोसले तसेच आमदार मकरंद पाटील यांना महत्त्वाच्या बैठका होत्या. उदयनराजे हे या ठिकाणी येऊन गेले आहेत. तसेच त्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले."

udayanraje bhosale ajit pawar
Loksabha Election 2024 : भाजपकडून सातारा लोकसभेसाठी कोण असणार? अतुल भोसलेंनी घेतलं थेट 'हे' नाव

महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर येत आहे, याकडे लक्ष वेधले असता शंभूराज देसाई म्हणाले, "बरीच नावे समोर येतायत. पुन्हा मागे पडतायंत. जोपर्यंत लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. महायुतीच्या कोट्यातून भाजपचे 20 उमेदवार जाहीर झालेत. शिवसेना (शिंदे गट) आठ तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) चार ते पाच नावे जाहीर झाली आहेत. दुसरा टप्प्यातील नावे लवकरच जाहीर होतील."

"निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) सत्तेचा वाटा मिळत नाही. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा निर्णय होत नाही. तोपर्यंत तटस्थ राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे," असं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले.

( Edited By : Akshay Sabale )

R

udayanraje bhosale ajit pawar
Loksabha Election 2024 : भाजपकडून सातारा लोकसभेसाठी कोण असणार? अतुल भोसलेंनी घेतलं थेट 'हे' नाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com