Loksabha Election 2024 : शशिकांत शिंदे पवारांच्या भेटीला; साताऱ्याचा आज फैसला..?

Satara Lok Sabha Election : आज सायंकाळपर्यंत राष्ट्रवादीची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साताऱ्यातून कोणाचे नाव पवारांनी निश्चित केलंय हे समजणार आहे.
Sharad Pawar, Shashikant Shinde
Sharad Pawar, Shashikant ShindeSarakrnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले आमदार शशिकांत शिंदे व सारंग पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांबाबत (Satara Constituency) चर्चा झाली. श्रीनिवास पाटलांनी (Shrinivas Patil) प्रकृतीच्या कारणाने साताऱ्यातून लढण्यास नकार दिल्याने आता यासाठी आमदार शशिकांत शिदेंचे नाव पुढे आल्यामुळे आज भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत राष्ट्रवादीची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साताऱ्यातून कोणाचे नाव पवारांनी निश्चित केलंय हे समजणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, आम्ही खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटायला आलो होतो. सातारा माढा मतदारसंघाच्या बाबतीत पवारसाहेबांशी चर्चा झाली. काय करावे लागेल, संभाव्य उमेदवारांच्या बाबतीत चर्चा झाली. श्रीनिवास पाटलांनी स्वत:ची मानसिकता दाखवली होती. मागे पवारसाहेबांच्या प्रेमापोटी ते उदयनराजेंच्या (Udyanraje Bhosale) विरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते. ते माघार घेणारे नाहीत. ते लढवय्ये आहेत. पण, निवडणूक लढण्याची मानसिकता असतानाही केवळ तब्येतीमुळे ते लढणार नाहीत, असे शशिकांत शिंदेंनी सांगितले.

Sharad Pawar, Shashikant Shinde
Lok Sabha Election 2024 : शिंदेंचा शिलेदार पवारांच्या भेटीला; साताऱ्यातून तुतारीवर लढणार?

साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी असंख्य कार्यकर्ते करत आहेत. राष्ट्रवादीचा साताऱ्यातील शाश्वत चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे शरद पवारसाहेब जो उमदेवार देतील त्यांचे आम्ही काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शशिकांत शिंदेंचे नाव निश्चित होणार का, यावर शशिकांत शिंदे म्हणाले, पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डापुढे दोन, तीन नावे आहेत. त्यापैकी ज्या कोणाचे नाव दिले जाईल, त्याला पाठिंबा देऊन आम्ही काम करणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.

शरद पवारांचा नकार...

शरद पवारांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी झाली होती का, या प्रश्नावर शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, आम्ही सर्वांनी पवारसाहेबांनी साताऱ्यातून लढावे, अशी मागणी केली होती. यशवंतराव चव्हाणानंतर साताऱ्यातून शरद पवारांनी निवडणूक लढली तर आम्हाला त्यांना निवडून देण्याचे भाग्य लाभेल. तसेच आमच्या नेत्याला मतदान करण्याची संधी मिळेल, असे वाटत होते. पण त्यांनी पहिल्यांदाच आपण निवडणूक लढणार नाही, देशाच्या महाराष्ट्रात या निवडणुकीत फिरावे लागेल, त्यामुळे मला तिकडे पूर्णपणाने वेळ द्यावा लागेल, त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.

Edited By : Rashmi Mane

R

Sharad Pawar, Shashikant Shinde
Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटलांनंतर सांगोल्याचे देशमुख पवारांना भेटले; पवारांच्या मनात नेमकं काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com