Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत फेक न्यूजवर राहणार आयोगाची करडी नजर

Fake News in Election : निवडणुकीच्या काळात अनेकदा सोशल मीडियामध्ये विविध घटनांबाबत, उमेदवारांविषयी अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होते.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama

Kolhapur News : निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर चुकीचे व अपुऱ्या माहितीवरील निराधार वृत्त तसेच फेक न्यूज याबाबत बारकाईने लक्ष देऊन निवडणूक कालावधीतील अपप्रचार रोखावा’, अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी येथे मीडिया सेंटरसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य व त्याअनुषंगाने कामकाजासाठी स्थापन केलेल्या मीडिया सेंटरच्या अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण झाले. यावेळी ते बोलत होते.

Lok Sabha Election 2024
Sangali Corporation Budget : पदाधिकारीच नसल्याने 'फुगीर योजनांना' कात्री ; सांगली महापालिकेचे 823 कोटींचे बजेट सादर...

जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, ‘पीआयबी’चे महेश चोपडे, मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक, आकाशवाणी कोल्हापूरचे सुनील गायकवाड, समिती सदस्य शीतल धनवडे उपस्थित होते. जिल्हास्तरावर कार्यरत माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) पेड न्यूज (Paid News) व जाहिरात प्रमाणिकरण करण्यासाठी कामकाज पाहते.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समितीचे सचिव सचिन अडसूळ यांनी पेड न्यूज, फेक न्यूज, माध्यम प्रमाणीकरण तसेच मीडिया सेंटरच्या कामकाजाबाबत 65 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. त्यांनी माध्यमांच्या निवडणूक (Election) वार्तांकनाच्या पद्धती, पेड न्यूज, फेक न्यूजबाबत (Fake News) सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया याबाबत स्कॅनिंग कसे करायचे याची माहिती दिली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील पंधरा ते वीस दिवसांत जाहीर केल्या जाण्याच्या शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सर्व राज्यांमध्ये तयारीचा आढावा घेतला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील तयारीची शेवटची बैठक होणार असल्याचे समजते. त्यानंतर लगेच तारखा जाहीर केल्या जाऊ शकते. महाराष्ट्रात (Maharashtra) चार टप्प्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे.

(Edited By - Rajanand More)

Lok Sabha Election 2024
Mahayuti Government : महायुतीचा 'मविआ'ला नवा झटका; मुंबईत 3 तर इतर महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com