Mahayuti Government : महायुतीचा 'मविआ'ला नवा झटका; मुंबईत 3 तर इतर महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय रद्द महायुती सरकारने गुरुवारी रद्द केल्याची माहिती मिळते.
Ward Arrangement
Ward ArrangementSarkarnama

Mumbai Political News :

राज्यातील खोळंबलेल्या महापालिका निवडणुकींबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या काळातील तीन सदस्य प्रभाग रचना रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. सरकारने महापालिका निवडणुकीत पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयात कोल्हापूर महापालिकेचाही समावेश आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये नवीन प्रभाग रचना असणार असून विधानसभेत विधेयक मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.

Ward Arrangement
Sanjay Raut PC : 'गटारातलं राजकारण' फडणवीस आल्यापासून... ; पवारांना निमंत्रण नसल्याने राऊतांचा तीळपापड!

राज्यातील 24 महापालिकांची मुदत संपली आहे. निवडणुकीसाठी (Elections) लगतच्या लोकसंख्येनुसार तीन सदस्य प्रभाग रचना करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिले होते. तर कोरोना काळात निवडणूक लांबणीवर गेल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. यानुसार काही महापालिकामध्ये एक सदस्य प्रभागरचना प्रसिद्ध करून आरक्षण काढण्यात आले. मतदारयादीही अंतिम करण्यात आली होती.

मात्र मार्च 2021 मध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश आले. महाविकास आघाडी सरकारने (MVA) बहुसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑक्टोबर 2021 मध्ये त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार महापालिकेची प्रभागरचना करण्यात आली. तत्कालीन शासनाच्या आदेशानुसार नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे (Assembly Election) महापालिकांच्या निवडणुकांबाबत सरकार सकारात्मक झाले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केव्हाही महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजू शकते. त्या अनुषंगाने राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून मुंबई वगळून राज्यातील सर्वच मुदत संपलेल्या महापालिकेत चार सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. याबाबत आज विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी येणार आहे.

(Edited by Avinash Chandane)

Ward Arrangement
Sanjay Raut PC : 'गटारातलं राजकारण' फडणवीस आल्यापासून... ; पवारांना निमंत्रण नसल्याने राऊतांचा तीळपापड!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com