Gadchiroli Lok Sabha Election : ‘ते’ तिकडचे राजे, इकडचा राजा मी आहे; कोण म्हणालं असं?

Dharmarao Baba Atram : वरिष्ठ लोक बोलल्यानंतर मी त्यामध्ये काय बोलणार? सध्या सगळे वरिष्ठ बसले आहेत. आजसुद्धा दिल्लीला जाणार आहेत. जो काही निर्णय होईल, त्या निर्णयाप्रमाणे आपण मान्य करू.
Dharmarao Baba Atram and Udyanraje Bhosale
Dharmarao Baba Atram and Udyanraje BhosaleSarkarnama

Gadchiroli Lok Sabha Election : पूर्व विदर्भातील रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अद्यापही ठरलेले नाहीत. इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागलेला आहे. महायुतीची बैठक आज दिल्लीत आहे. या बैठकीपासून इच्छुकांना मोठ्या अपेक्षा आहेत. अजित पवार गटाचे नेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गडचिरोलीतून लढण्यास इच्छुक आहेत, पण अद्याप घोषणा न झाल्यामुळे उमेदवारीबाबत ते सावध विधाने करीत आहेत.

सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले इच्छुक आहे. त्यांनी तिकीट मागितले आहे. त्यासाठी ते दिल्लीला अमित शाह यांना भेटायला गेले. पण अद्याप त्यांच्या उमेदवारीबाबत काहीही फैसला झालेला नाही. इकडे दुसरे राजा, राजे धर्मरावबाबा आत्रामही तिकिटाची आस लावून बसलेले आहेत. यासंदर्भात आज (ता. 23) धर्मरावबाबांनी पत्रकारांशी संवाद साधला. उमेदवारीबद्दल विचारले असता, उदयनराजे तिकडे राजे आहेत, तर इकडचा राजा मी आहे. महायुतीचे नेते माझ्या उमेदवारीबद्दल सकारात्मक विचार करतील, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dharmarao Baba Atram and Udyanraje Bhosale
Dharmarao Baba Atram : दादांच्या आमदाराला खात्री, विदर्भात जिंकणार फक्त महायुती | Loksabha |

गडचिरोलीचं तिकीट जाहीर झालं नाही. सगळ्यांना त्याचं टेन्शन आलंय. एका जागेकरिता सगळा महाराष्ट्र थांबवलाय. त्या दृष्टिकोनातून लवकरच म्हणजे आज निर्णय होईल. जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील, त्याला निवडून आणण्याचे काम माझ्यावतीने केले जाईल. यासंदर्भात अधिक विचारण्याचा प्रयत्न केला असता, वरिष्ठ लोक बोलल्यानंतर मी त्यामध्ये काय बोलणार? सध्या सगळे वरिष्ठ बसले आहेत. आजसुद्धा दिल्लीला जाणार आहेत. जो काही निर्णय होईल, त्या निर्णयाप्रमाणे आपण मान्य करू, जो कोणी माहायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचे काम आपण करू, असे आत्राम म्हणाले.

पक्षाने आदेश दिल्यास आमची तयारी पूर्ण आहे. सगळं झालंय नॉमिनेशन भरण्याकरिता फक्त चार तास वेळ लागतो. जे जे उभे राहणारे अपेक्षित उमेदवार आहेत, त्या सगळ्यांनी ठरवलं आहे. माझेसुद्धा कागदपत्र तयार आहेत. जर पक्षाचा आदेश आला तर मी तत्काळ उमेदवारी अर्ज भरेल, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

R

Dharmarao Baba Atram and Udyanraje Bhosale
Dharmarao Baba Atram News : प्रफुल्ल पटेलांच्या गोंदियासाठी धर्मरावबाबा आत्राम यांना वेळ मिळेना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com