Lok Sabha Election : शिंदे गटात अस्वस्थता! भाजपच्या दाव्याने जिल्ह्यातले राजकारण फिरणार

Bjp Claims One Lok Sabha Constituency In Kolhapur District : कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीत राजकारण तापणार...
Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik, Dhairyashil Mane
Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik, Dhairyashil ManeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics News : पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. यामुळे महाराष्ट्रातही भाजपचा आत्मविश्‍वास वाढला आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद आजमावण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. कोल्हापुरातही भाजपने प्रयत्न सुरू केल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटात अस्वस्थता आहे.

भाजपला जिल्ह्यातील लोकसभेची एक तरी जागा हवी आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दावाही केला आहे. राज्यातील एखादी जागा शिंदे गटाला देऊन त्या बदल्यात कोल्हापूरची जागा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यातून या महायुतीतील दोन पक्षांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik, Dhairyashil Mane
Assembly Election Results 2023 : चार राज्यांच्या निकालानंतर कोल्हापुरातील नेत्यांनी लढवला वेगळाच तर्क

जिल्ह्यात प्रा. संजय मंडलिक हे कोल्हापूरचे आणि धैर्यशील माने हातकणंगलेचे खासदार आहेत. हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. या दोनपैकी एका विद्यमान खासदाराला 'कमळ' चिन्हावर रिंगणात उतरले जाऊ शकते. त्याची चाचपणी मध्यंतरी भाजपच्या पातळीवर सर्वेक्षणातून करण्यात आली, पण त्याचा अहवाल फारसा चांगला आलेला नाही. त्यामुळे जागा मिळवण्याएवढेच मोठे आव्हान भाजपसमोर उमेदवार देण्याचे आहे.

भाजपची तयारी सुरू असताना विरोधी महाविकास आघाडीत मात्र अजून शांतता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार काँग्रेसचे आहेत. या जोरावर काँग्रेसची बाजू भक्कम आहे. पण राज्य पातळीवर महाविकास आघाडीचे जागावाटप करताना कोणता विचार केला जाईल यावर कोल्हापुरातील जागा कोणाला द्यावी, याचा निर्णय होईल. जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांवर ठाकरे गट दावा करेल. पण ताकदीचा उमेदवार कोण? हा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादीचीही स्थितीही अशीच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनंजय महाडिक लोकसभेच्या रिंगणात?

जागावाटपात भाजपने कोल्हापुरातील एक जागा मिळवली तर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांना ऐनवेळी रिंगणात उतरले जाऊ शकते. पक्षादेश आल्यानंतर महाडिक यांच्यासमोरही पर्याय नसेल. त्यांनी नकार दिल्यास भाजपला सक्षम उमेदवाराचा शोधावा लागेल.

आघाडीचा उमेदवार कोण?

सध्या काँग्रेसमधून बाजीराव खाडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील इच्छुक आहेत. ठाकरेंच्या सेनेकडून विजय देवणे, संजय पवार, माजी आमदार संजय घाटगे लढण्याच्या तयारीत आहेत. 'गोकुळ'चे संचालक डॉ. चेतन नरकेही चाचपणी करत आहेत. यामुळे यापैकीच कोणाला संधी मिळेल की ऐनवेळी काँग्रेसचा बडा नेता रिंगणात उतरेल यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik, Dhairyashil Mane
Bidri Sugar Factory Elections : मतदानाआधीच मुश्रीफांनी ‘बिद्री’चा निकाल जाहीर करून टाकला; आजऱ्याचंही गुपित उलगडलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com