Bidri Sugar Factory Elections : मतदानाआधीच मुश्रीफांनी ‘बिद्री’चा निकाल जाहीर करून टाकला; आजऱ्याचंही गुपित उलगडलं

Kolhapur Politics : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आजी-माजी पालकमंत्र्यांसह आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Bidri Sugar factory Election-Hasan Mushrif
Bidri Sugar factory Election-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या कारखान्यासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांसह आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बिद्री कारखान्यासाठी उद्या (ता. ३ डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बिद्री कारखान्याचा निकाल लावला आहे. (NCP panel to be elected in Bidri Sugar factory elections : Hasan Mushrif's Claim)

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आज (ता. 2 डिसेंबर) पत्रकार परिषदेत त्यांनी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. त्याचबरोबर नुकत्याच लागलेल्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक लढण्यामागचे गुपितही सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bidri Sugar factory Election-Hasan Mushrif
Solapur NCP : अजित पवारांंनी दिला एकनिष्ठ शिलेदाराला न्याय; दहा वर्षांची प्रतीक्षा संपली

बिद्री कारखान्याचा निकाल लागलेला आहे. सर्वच्या सर्व उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत. केवळ घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे. असे वक्तव्य करून मतदानाआधीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बिद्री कारखान्याचा निकाल जाहीर करून टाकला आहे.

प्रचारादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याबद्दल, डिपॉझिट जप्त होईल, असे बोललो होतो. पण, ते भाषणात बोलणे चांगले असते. पण, त्यांचा मोठ्या मतांनी पराभव होईल, असे भाकितही मुश्रीफ यांनी केले.

ए. वाय. पाटील हे अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आहे. पण आजरा कारखान्याच्या निवडणुकीत ते मुश्रीफ यांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांनी प्रचारात बोलताना पाटील यांचा पराभव होईल, असे छातीठोकपणे सांगितले.

Bidri Sugar factory Election-Hasan Mushrif
Ajit Pawar Group Leader Statement : ‘लोकसभेची काळजी तुम्ही करू नका; भावाला बहिणीची काळजी आहे...’

आजरा कारखान्यासंदर्भात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील आणि स्वतः मी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करत होतो. निवडणुकीमुळे कारखान्यावर अधिक आर्थिक बोजा पडणार आहे. निवडणुकीचा खर्च वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघारही घेतली होती. मात्र, भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी भडकाऊ भाषण केली. त्यामुळे राष्ट्रवादीला अस्तित्व टिकवण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले, असेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Bidri Sugar factory Election-Hasan Mushrif
Baramati Loksabha : अजितदादांच्या बारामती लढविण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना सुळेंचे सूचक विधान; ‘माझ्या पोटात खूप गोष्टी...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com