Kolhapur Politics : योग्‍य वेळी, योग्य निर्णय..! पक्ष बदलले, झाले खासदार..!

Lok Sabha Election Special Analysis : संधी मिळताच पक्ष बदलले आणि खासदारकीवर मोहर उमटवली. ऐनवेळी पक्ष बदलाचा निर्णय या नेत्यांच्या राजकीय जीवनात ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama

Kolhapur Politics : राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे राजकारणात योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तर त्याचा फायदाही होऊ शकतो. याचा प्रत्यय लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांच्या बाबतीत आला आहे. माजी खासदार निवेदिता माने, त्यांचे पुत्र खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane), दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, त्यांचे पुत्र खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आदींनी संधी मिळताच पक्ष बदलले आणि खासदारकीवर मोहर उमटवली. ऐनवेळी पक्ष बदलाचा निर्णय या नेत्यांच्या राजकीय जीवनात ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.

स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी त्यावेळच्या इचलकरंजी व आताच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांचे नेतृत्‍व उदयास आले. निवेदिता माने यांनी पहिल्यांदा हातकणंगलेतून 1996 ची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. पण, दोन लाख 900 मते त्यांनी मिळविली. त्यानंतर दोनच वर्षांनी झालेल्या 1998 च्या निवडणुकीत त्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, त्यात दुसऱ्या क्रमांकाची तब्बल तीन लाख 32 हजार 623 मते मिळूनही पराभव झाला. The decision to change the party at the same time became a 'turning point' in the political life of these leaders.

1998 नंतर परत वर्षभरात झालेल्या निवडणुकीत निवेदिता माने (Nivedita Mane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेतला आणि 12 हजार 812 मतांनी विजय मिळवत पहिल्यांदा खासदारकी मिळविली. त्यानंतर 2004 मध्येही त्या राष्ट्रवादीच्या (NCP) चिन्हावरच एक लाख एक हजार मताधिक्य घेऊन खासदार झाल्या. 2009 च्या पराभवानंतर त्या राजकारणापासून अलिप्त झाल्या. पण, त्याच दरम्यान त्यांचे पुत्र धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी लोकसभेची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे वाटल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि हातकणंगलेतून (Hatkanangale) ते विजयी झाले. आता पुन्हा ते सेनेकडून रिंगणात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची ओळख ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक अशीच होती. या जोरावर ते राज्यमंत्री झाले. या जोरावर ते 1998 मध्ये काँग्रेसकडून, तर 1999, 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून (NCP) खासदार झाले. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी नाकारली आणि ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि तब्बल 42 हजार मतांनी विजयी झाले. तेव्हापासून पक्षापासून दुरावलेल्या मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी 2014च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी घेतली त्यात त्यांना अपयश आले असले तरी खचून न जाता पुन्हा ते 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावरच खासदार झाले. आज पुन्हा ते शिवसेनेकडूनच रिंगणात आहेत.

Kolhapur Politics
Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar : राधाकृष्ण विखेंचं शरद पवारांवर टीकास्त्र; म्हणाले, 'नगर जिल्ह्याचं..'

2004 च्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेच्या तिकिटावर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) रिंगणात उतरले. अगदी कमी कालावधी असूनही त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची उठबस वाढली. त्यातून 2009 च्या लोकसभेसाठी ते उमेदवारीच्या रिंगणात होते. पण, त्यांच्याऐवजी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी मिळाली. पण, महाडिक हे पक्षासोबतच राहिले. या जोरावर 2014 ला त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आणि ते विजयीही झाले. विद्यमान खासदार असल्याने 2014 ला त्यांनाच उमेदवारी मिळाली. पण, आमदार सतेज पाटील (Satej Patil) व त्यांच्यातील वादात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांपासूनच दुरावले आणि कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते भाजपकडून राज्यसभेचे खासदार आहेत. Dhananjay Mahadik distanced himself from the parties and eventually joined the BJP. Now he is a Rajya Sabha MP from BJP.

राष्ट्रवादीकडून 2009 च्या निवडणुकीत लोकसभेचे उमेदवार असलेले युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव झाल्यानंतर ते राजकारणापासूनच अलिप्तच होते. राज्यात व केंद्रात 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर भाजप नेतृत्वाचे त्यांनी लक्ष वेधले. छत्रपती घराण्याचा वारसा, स्वच्छ राजकीय चारित्र्य, तरुण या जोरावर 2016 मध्ये त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर भाजपने संधी दिली आणि त्यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर आमदारांतून निवडून द्यायच्या राज्यसभा खासदारकीसाठी त्यांनी प्रयत्न केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही. यावेळच्या लोकसभेच्या रिंगणातही उतरण्याची त्यांची तयारी होती. पण, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून त्यांचे वडील व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनाच उमेदवारी दिल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. सध्या ते शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.

Edited By : Rashmi Mane

R

Kolhapur Politics
Solapur Lok Sabha Seat : '10 वर्ष भाजपचा खासदार, सोलापूरच्या जनतेला हिशेब...' ; प्रणिती शिंदेंनी सातपुतेंना डिवचलं!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com