Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar : राधाकृष्ण विखेंचं शरद पवारांवर टीकास्त्र; म्हणाले, 'नगर जिल्ह्याचं..'

Nagar South Lok Sabha Constituency : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज झाले.
Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Radhakrishna Vikhe and Sharad Pawarsarakarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : भाजपचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 'नगर जिल्ह्याचे वाटोळे शरद पवार यांनी केले. नगर जिल्ह्यात विकासात्मक काम करण्यासाठी धडपडत असलेल्या विखे परिवाराला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून वारंवार होत आला आहे.', असा गंभीर आरोप मंत्री विखे यांनी केला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री विखे यांनी थेट शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावरच हल्ला चढवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Ahmednagar Loksabha 2024 : नगरच्या राजकारणात 'सैराट', सुजय विखेंना नीलेश लंकेंचं इंग्रजीत उत्तर

मंत्री विखे(Radhakrishna Vikhe) म्हणाले, "शरद पवार यांच्याकडून विखेंना निस्तेनाबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. हा प्रयत्न आजचा नाही. नगर जिल्ह्यामधील असंतुष्ट लोकांची मोट बांधायची. त्यांना फक्त शिमगा करायला लावायचा. परंतु हे करताना शरद पवार यांचे नगर जिल्ह्यासाठी योगदान काय आहे, हे देखील पाहिले पाहिजे".

याशिवाय 'एमआयडीसीसाठी यांचे योगदान काय आहे? जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी योगदान आलाय का? कुकडीचा कालवा 1400 क्युसेक वरून 800 क्युसेक करून ठेवलाय. केंद्रामध्ये हे संरक्षण मंत्री होते त्यावेळेस के. के. रेंजचा प्रश्न सोडवता आला असता. परंतु त्यावर देखील त्यांनी काम केले नाही. लोकांच्या जिव्हाळ्याच्या असलेला हा प्रश्न का निकाली काढला नाही. म्हणून आयात केलेला उमेदवार उभा करून निवडणूक लढवत आहे. परंतु जनता ही दूधखुळी नाही.' असे मंत्री विखे यांनी म्हटले.

'शरद पवार यांचे मनसुबे 2019 मध्येच नगर जिल्ह्यातील जनतेने धुळीस मिळवले होते. या वेळेस देखील भाजपचा उमेदवार नगर जिल्ह्यात गेल्या वेळेपेक्षा जास्त मताने निवडून येईल.' असा विश्वास व्यक्त करत हेच उत्तर शरद पवार यांच्या नकारात्मक भूमिकेला असेल, असे मंत्री विखे यांनी म्हटले.

Radhakrishna Vikhe and Sharad Pawar
Shivsena UBT News : 'ठाकरेंशी गद्दारी केल्याने गोडसेंवर वणवण भटकण्याची वेळ'; सुधाकर बडगुजर यांचा टोला!

'नगरमधील एमआयडीसीचा काही जणांनी ठेकेदारीसाठी वापर केलेला आहे. हे ठेकेदार कोण आहेत, भंगाराचा व्यवहार कोण करत आहेत, भंगार माफिया कोण आहेत, एमआयडीसीत आमचाच माल घेतला पाहिजे हे सर्व काही आमच्या समोर आहे. याकडे आम्ही कधीच पाहिले नाही. दुर्लक्ष केले. परंतु आता पाहावे लागेल या माफीयांचा बंदोबस्त करावा लागेल.', असेही मंत्री विखे यांनी म्हटले.

याशिवाय 'विकासाचा हा मुद्दा होऊ शकत नाही. परंतु महाविकास आघाडीकडे राज्याचे अडीच वर्ष सत्ता होती. यांना एमआयडीसी काढता आली असती. परंतु यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही. अडीच वर्षांमध्ये एक बाहेरचा उद्योग येऊ शकला नाही. सुपा एमआयडीसीमधील क्लस्टरचा प्रोजेक्ट घालवायचं पाप हे करत आहेत. एमआयडीसीचा विस्तार थांबला आहे. हे पाप कोणाचा आहे?.' असाही सवाल मंत्री विखे यांनी यावेळी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com