Satara Loksabha constituency News : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आग्रही राहणार असून 3 मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार गुरुवारी मुंबईत झालेल्या आमदार व पदाधिकारी यांच्या बैठकीत करण्यात आला.
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी प्रदेश राष्ट्रवादी भवनात झाली. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सर्वांनी सातारा व माढा लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपात आपण आग्रही राहण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण स्वतः सातारा लोकसभेसाठी आग्रही आहोत, कोणत्याही परिस्थितीत आपण ही जागा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माढा लोकसभेसाठी संजीवराजे नाईक निंबाळकर हे इच्छुक असून त्यासाठीही आग्रह धरण्याबाबत चर्चा झाली.
पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळाले असल्याने आता सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी चांगल्याप्रकारे करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच येत्या तीन मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभेचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत व ताकतीने उभे करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली. सातारा लोकसभेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व माढा लोकसभेसाठी राम राजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे इच्छुक आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ मिळण्यासाठी ताकत लावण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी शशिकांत पिसाळ, बाळासाहेब सोळसकर, नितीन भरगुडे पाटील, उदय कबुले, प्रमोद शिंदे, मनोज पोळ, नंदकुमार मोरे, शिवाजीराव महाडिक, राजाभाऊ उंडाळकर, राजेश पाटील- वाठारकर, सुरेंद्र गुदगे, नितीन भिलारे, प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, दत्ता नाना ढमाळ, राजेंद्र तांबे , महादेव मस्कर, सुरेश साळुंखे, मनोज पवार, भाई डोंगरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.