Loksabha Election 2024 : सातारा मतदारसंघ अजित पवारांकडे? बारामती, साताऱ्याला भाजपचा निरीक्षकच नाही

Satara Loksabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने निरीक्षक नेमताना बारामती, सातारा वगळले आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्याची चर्चा सुरू आहे
Sharad Pawar, Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Sharad Pawar, Ajit Pawar, Udayanraje BhosaleSarkarnama

Satara Political News :

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील २३ जागांवर निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बारामती तसेच सातारा मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे या जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या जागेसाठी आधीपासूनच भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे आता राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Baramati Loksabha : बारामतीत एकेका मताची बेरीज सुरू; शरद पवारांनंतर सुनेत्रा पवारांनीही घेतली पृथ्वीराज जाचकांची भेट

बारामती मतदारसंघात (Baramati Loksabha Constituency) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे. तर साताऱ्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार दिला जाणार आहे. परिणामी साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सातारा लोकसभेची निवडणूक (Satara Loksabha Constituency) महायुतीतील घटक पक्षांच्या दावेबाजीमुळे हॉट बनली होती. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. भाजपने (BJP) तर मागील निवडणुकीपासून येथून खासदार निवडून आणण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यांनी आजपर्यंत उमेदवार उघड केलेला नाही. जिल्ह्यात भाजपचे अनेक नेते, मंत्री दौऱ्यावर आले. त्यांनी भाजपचा खासदार निवडून द्या, मोदींचे हात बळकट करा, एवढेच आवाहन केले. पण, उमेदवाराचे नाव कोणीही घेतले नव्हते.

अजित पवारांनी (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाल्यापासून त्यांनी बारामती आणि सातारा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आता भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील 23 जागांवर निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, पुणे, नागपूर, भिवंडी, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, वर्धा, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, माढा, सांगली या जागांचा समावेश आहे.

यामध्ये बारामती, सातारा, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जागा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्या गटाला मिळणार, हे निश्चित आहे. बारामती आणि सातारा लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांना मिळणार हे यातून स्पष्ट होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharadchandra Pawar) यांच्या पक्षाकडून सातारा लोकसभेसाठी उमेदवार दिला जाईल. खासदार श्रीनिवास पाटील यांना संधी मिळेल. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात काका, पुतण्याच्या राष्ट्रवादीच्या तुतारी आणि घड्याळ चिन्हातच लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha Constituency) भाजपने निरीक्षक दिला आहे. येथून भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर इच्छूक आहेत. तर मोहिते पाटील यांच्या घरातील धैयशील मोहिते पाटील हेही इच्छूक आहेत. तसेच अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे.त्यामुळे भाजप येथून कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (MVA) सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभयसिंह जगताप इच्छूक आहेत. तर रासपचे महादेव जानकर हे महाविकासमध्ये सहभागी झाले तर तेही उमेदवार असू शकतात. त्यामुळे माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)

Sharad Pawar, Ajit Pawar, Udayanraje Bhosale
Loksabha Election 2024 : सातारा लोकसभेसाठी अजित पवार आग्रही ; महामेळाव्यातून रणशिंग फुंकणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com