Loksabha Election 2024 : साथ देणाऱ्या ओमराजेंना धाराशिवमध्ये ठाकरेंचं बळ; सलग दुसऱ्यांदा विजयाचा इतिहास घडणार?

Uddhav Thackeray : दोन दिवसांच्या धाराशिव दौऱ्यात उद्धव ठाकरे मेळावे, सभा घेत मतदारसंघ पिंजून काढणार
Uddhav Thackeray, Omprakash Rajenimbalkar
Uddhav Thackeray, Omprakash RajenimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Loksabha Constituency News :

उद्यापासून दोन दिवस दिवस पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी मोठ्या घडामोडींचा असणार आहे. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं राज्यस्तरीय महाअविवेशन होणार आहे तर त्याचवेळी उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंचे टीकेचे बाण एकनाथ शिंदे कसे निष्प्रभ करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) दुसऱ्यांदा लोकसभेसाठी मैदानात असणार आहेत. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अनेक जनसंवाद मेळावे घेणार आहेत. शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Loksabha Constituency) यावेळी इतिहास घडणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray, Omprakash Rajenimbalkar
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले; पण मंत्री भुमरे, सत्तार, शिरसाटांना सोडले...

2009 मध्ये लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकच उमेदवार सलग दुसऱ्यांदा विजयी होऊ शकला नाही. आणि ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर दुसऱ्यांदा लोकसभेसाठी मैदानात असणार आहेत. म्हणून उद्धव ठाकरेंचा झंजावाती दौरा अशक्य ते शक्य करून दाखवणार का, याकडे इथल्या मतदारांचेही लक्ष लागले आहे.

2014 मध्ये शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड धाराशिव लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तर 2019 मध्ये शिवसेनेचे (Shivsena) ओमप्रकाश राजे निंबाळकर निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर ओमप्रकाश राजे निंबाळकर (MP Omprakash Rajenimbalkar) यांनी ठाकरेंना साथ दिल्यामुळे हा मतदारसंघात महाविकास आघाडीत (MVA) ठाकरेंकडे आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे 16 आणि 17 फेब्रुवारीच्या धाराशिव दौऱ्यात तुळजाभवानीचं दर्शन घेतील. तसेच औसा, लामजना चौक, उमरगा आणि तुळजापूर येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अलीकडेच त्यांनी रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठाणे जिल्ह्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ तसेच छत्रपती संभाजीनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला.

उद्धव ठाकरे शुक्रवारी (16 फेब्रुवारी) औसा, उमरगा, तुळजापूरचा दौरा करतील. तर त्यांचा मुक्काम धाराशिवमध्ये असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (17 फेब्रुवारी) वाशी, भूम, परांडा आणि बार्शीचा दौरा करणार आहेत. हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतानाच उद्धव ठाकरे मेळावे आणि सभादेखील घेणार आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Uddhav Thackeray, Omprakash Rajenimbalkar
Kolhapur Lok Sabha : छत्रपती घराण्यालाच काँग्रेसची साथ; पण ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com