Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले; पण मंत्री भुमरे, सत्तार, शिरसाटांना सोडले...

Shivsena News: ठाकरेंवर कायम खालच्या पातळीवर टीका करणारे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि आमदार संजय शिरसाट मात्र उद्धव ठाकरे यांच्या टीकेतून सुटले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 12 रोजी झालेल्या मराठवाड्यातील पहिला जनसंवाद दौरा फारसा चर्चिला गेला नाही. ठाकरेंनी आपल्या भाषणातून राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सोडला तर त्यांचा निशाणा भाजपवरच होता हे यातून स्पष्ट झाले. (Uddhav Thackeray News )

पण शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरेंवर कायम खालच्या पातळीवर टीका करणारे छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि आमदार संजय शिरसाट मात्र त्यांच्या टीकेतून सुटले. ठाकरेंनी आपला मोर्चा ज्यांना ते गद्दार म्हणतात त्यांच्याकडे का वळवला नाही ? याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील टीव्ही सेंटरच्या मैदानात संजय राऊत यांनी फक्त मंत्री अब्दुल सत्तार यांना आमचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यात जेलमध्ये पाठवू, असा इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Maratha Reservation : जरांगे-पाटलांच्या नाकातून रक्तस्त्राव; प्रकृती खालावली, अंतरवाली सराटीत मराठा समाजाची गर्दी

चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात सत्तार यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि पुराव्यांची फाईल राऊत यांच्याकडे सोपवल्यानंतर आणि आग्रहामुळे राऊत बोलले. खरंतर उद्धव ठाकरे यांच्या या जनसंवाद यात्रेची चांगली चर्चा झाली होती. परंतु उद्धव ठाकरेंचे पाय संभाजीनगरात पडले आणि तिकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे बडे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाले. त्यामुळे दिवसभर माध्यमांनीही उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा चव्हाण यांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याच्या घटनेला अधिक फुटेज दिले.

राऊत ठाकरे यांनी आपल्या भाषणातून चव्हाणांच्या या फुटीचा समाचार घेतला, पण या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरमधील जनसंवाद दौरा मात्र झाकोळला गेला. ग्रामीण भागात कन्नड, वैजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला, गंगापूरमध्ये जेमतेम गर्दी होती. बरं ठाकरेंची तीन्ही ठिकाणची भाषणंही सारखीच झाली.

त्यामुळे शहरातील टीव्ही सेंटरच्या मैदानात तरी ते गद्दारांचा समाचार घेतील अशा अपेक्षेने आलेल्या शिवसैनिक व शिवसेना ठाकरे गटाबद्दल सहानुभूती असलेल्या सर्वसामान्यांना होती. पण इथेही ठाकरे यांच्याऐवजी संजय राऊत हेच भाव खावून गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सर्वाधिक साथ याच संभाजीनगर जिल्ह्यातून मिळाली.

शिंदेच्या सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे सातत्याने ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीक करतात. याचा समाचार उद्धव ठाकरे घेतील, असे वाटले होते. परंतु त्यांनी या तिघांकडे दुर्लक्ष करत त्यांच्यावर बोलणे टाळले. परिणामी ही जनसंवाद यात्रा फारशी छाप पाडू शकलेली नाही.

(Edited By-Ganesh Thombare)

Uddhav Thackeray
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी भाजपची अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडेंना उमेदवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com