Loksabha Election : माढ्यात भाजपविरोधात अजित पवार गट आखाड्यात; महायुतीची 'ऐशी की तैशी'

Madha Loksabha Constituency : राज्यात महायुती असताना माढ्यात सत्ताधाऱ्यांनीच एकमेकांविरोधात थोपटले दंड
Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Karad Political News :

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) महायुती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणणार भाजपचे मिशन आहे. पण महाविकास आघाडीला आव्हान देणाऱ्या महायुतीलतील दोन पक्ष माढ्यात एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने राज्यात काही दिवसांनी असेच चित्र दिसेल का, याची चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीतील पैलवानांकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) जोरबैठका काढण्यास सुरूवात झाली आहे. यात माढा लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात अजित पवार (Ajit Pawar) गटाने रणशिंग फुंकले आहेत. माढा मतदारसंघ सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात विभागला आहे.

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Lok Sabha Elections 2024 : 'माढ्या'वरुन राजकारण तापलं; दोन निंबाळकरांमध्ये जुंपली...

सातारा जिल्ह्यातील फलटण, माण-खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही उत्तर भागांचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा याठिकाणी गणिते बांधताना कस लागलेला पाहायला मिळतो. यामध्ये सातारा जिल्ह्यातून प्रामुख्याने फलटण तालुक्यातील नाईक-निंबाळकर घराण्यात वाद जनतेला पाहायला मिळत आहे. परंतु, आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते माजी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)आमनेसामने आलेले आहेत.

रामराजे यांच्याकडून बंधू संजीवराजे यांना उमेदवारी काहीही करून मिळवणारच, असे ठासून सांगितले. एवढेच नव्हे तर भाजपचे खासदार रणजितसिंह (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी मिळू देणार नसल्याचेही म्हटले आहे. या वादामुळे माढा मतदारसंघातील खासदारकीचा वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी फलटण शहरात राजे गटाचा मेळावा झाला. यात लोकसभा निवडणुकीची भूमिका स्पष्ट करताना रामराजे नाईक-निंबाळकरांनी भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. या टीकेनंतर खा. रणजितसिंह निंबाळकरांनीही रामराजेंना प्रत्युत्तर दिले.

रामराजे नाईक-निंबाळकरांना राष्ट्रवादीत कधीच किंमत दिली गेली नाही. तसेच अजित पवार आणि रामराजे यांचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला ठावूक आहेत. एवढ्या वर्षांत नव्यांना मंत्रिपदे मिळाली परंतु रामराजेंना मंत्री केले नाही, असा खोचक टोला खासदार नाईक यांनी लगावला.

या दोन नेत्यांमधील वादामुळे भाजप आणि अजित पवार गट माढ्यात आमनेसामने आले आहेत. राज्यात युती असताना भाजप आणि अजित पवार गटाकडून खासदारकीचे रणशिंग फुंकले आहे. 

माढ्यात भाजपचे रणजितसिंहच!

माढा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. तसेच मला उमेदवारी द्यायची की नाही हे भाजपमधील वरिष्ठ सांगतील. रामराजे भाजपचे वरिष्ठ कधी झाले, असा सवाल करत मला माढ्यातून तयारीला लागण्यास सांगितले आहे. त्यामुळे माढ्यात पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर देशातील मोठ्या लीडने विजयी खासदारांमध्ये असेन, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Mangalvedha Upsa Sinchan : ‘फडणवीसांना ‘त्या’ आश्वासनाची आठवण करून देतो; लोकं आता वाट बघत आहेत’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com