Lok Sabha Elections 2024 : 'माढ्या'वरुन राजकारण तापलं; दोन निंबाळकरांमध्ये जुंपली...

Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjit Naik Nimbalkar : राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात सत्ता संघर्ष जुना आहे.  मागील वेळी माळशिरस मतदारसंघाने रणजितसिंह निंबाळकर यांना साथ दिली होते.
Ramraje Naik  Nimbalkar, Ranjit Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjit Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Phaltan News : माढा मतदारसंघातील जागेवरून महायुतीतील नेत्यांत सध्या भांडणे लागली आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे तिकीट कापण्याचे आव्हान दिले आहे. यामुळे खासदार निंबाळकर यांची डोकेदुखी वाढली आहे. या दोन नेत्यांतील हा वाद असाच वाढत गेला तर आगामी काळात महायुतीची माढा मतदारसंघात अडचण होणार आहे. (Lok Sabha Elections 2024)

Ramraje Naik  Nimbalkar, Ranjit Naik Nimbalkar
Ramraje Nimbalkar News: रामराजेंनी डाव टाकला; 'लोकसभेला माढ्यातून संजीवराजेच, ...तर त्यांनाही तिकीट मिळू देणार नाही!'

राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ( Ranjit Naik Nimbalkar) यांच्यात सत्ता संघर्ष जुना आहे.  मागील वेळी माळशिरस मतदारसंघाने रणजितसिंह निंबाळकर यांना साथ दिली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात खासदार निंबाळकर यांनी राजे गटाचा विरोध डावलून मोठ्याप्रमाणात विकास कामे केल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांना आमदार जयकुमार गोरे यांची साथ मिळाली. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर खासदार निंबाळकर यांचे नाव चांगले काम करणाऱ्या खासदारात नोंदवले गेले आहे. तसेच त्यांचे भाजपच्या केंद्रीय तसेच राज्यातील नेतृत्वाने ही कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शड्डू ठोकला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याची त्यांनी तयारीही सुरु केली आहे. मध्यंतरी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खासदार शरद पवारांना सोडून जिल्ह्यातील फलटणचा राजेगटही अजितदादा गटात सहभागी झाला. सध्या रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघेही महायुतीत सहभागी आहेत. पण, त्यांच्यातील वाद आजही कायम आहे.

यावेळेस माढा मतदारसंघातून राजे गटाने कोणत्या ही परिस्थितीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासदार निंबाळकरांचे तिकिट कापण्याचीही तयारी माजी सभापती रामराजेंनी केली आहे. फलटणमधील मेळाव्यात राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना खासदार निंबाळकरांवर टीकेची झोड उठवली होती. तसेच यावेळेस संजीवराजेंनाच निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. राजे गटाच्या या निर्णयामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची डोकेदुखी वाढणार आहे.

भाजपच्या अडचणीत वाढ

खासदार निंबाळकर यांनी आगामी लोकसभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय बांधणी केली आहे. त्यासाठी त्यांना आमदार जयकुमार गोरेंचे पाठबळ आहे. पण, रामराजेंचा खासदार निंबाळकर व आमदार गोरेंनाही टोकाचा विरोध असून त्यांनी आता संजीवराजेंना खासदार करण्यासाठी या दोघांनाही अंगावर घेण्याची तयारी केली आहे. यातूनच माढा लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत फलटणमध्ये संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष आता असाच पेटत राहिल्यास भाजपला अडचणीचे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

Ramraje Naik  Nimbalkar, Ranjit Naik Nimbalkar
Zeeshan Siddique News : अजित पवारांसोबत आमचे जुने संबंध; कौतुक करत सिद्दीकी पिता-पुत्रांचा सूचक इशारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com