Loksabha Election 2024 : जानकर करणार निंबाळकरांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन; माढ्यातून निवडणूक लढणार...

Madha Loksabha Constituency : रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी दिली माहिती तर रॅलीने फलटणला जाणार असल्याचे सांगितले.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Maan News : राष्ट्रीय समाज पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले असून येथून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार महादेव जानकर हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी रासपचा या मतदारसंघात विजयी निर्धार मेळावा येत्या 17 फेब्रुवारीला फलटणमध्ये होत आहे. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला अभिषेक घालून रॅलीने फलटणला जाऊन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या तालुक्यात जानकर शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

सध्या सातारा व माढा लोकसभा मतदारसंघावर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. तर भारतीय जनता पक्षाने तर दोन्ही मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. तर आजपर्यंत महायुतीसोबत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या पक्षानेही आता माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) विजयी निर्धार मेळाव्याचे आयोजन 17 फेब्रुवारीला फलटण येथे करण्यात आले आहे. माढा मतदारसंघातून स्वत: महादेव जानकर निवडणूक लढवणार आल्याचं रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Loksabha Election 2024 : मेधा कुलकर्णींना राज्यसभेची 'लॉटरी'; पुणे लोकसभेसाठी आता 'मराठा' उमेदवार

या मेळाव्याच्या दिवशी सकाळी शिखर शिंगणापुर (माण) येथील शंभू महादेवाला अभिषेक घालुन शिखर शिंगणापूर ते फलटण अशी शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या निमित्ताने महादेव जानकर आपली ताकद दाखवणार असुन भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात जानकर यांनी शड्डू ठोकल्याचं‌ पाहायला मिळत आहे. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघात विजय निर्धार मेळावे सुरु केले आहेत. त्यांचा पहिला मेळावा खासदार निंबाळकरांच्या बालेकिल्ल्यात होत आहे.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षानेदेखील आगामी लोकसभा निवडणुकीत 250 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच स्वत: रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हेदेखील माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या दोन्ही मतदारसंघांतून दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडणून येणार असल्याचा विश्वासही जानकर यांनी व्यक्त केला आहे.

(Edited by Amol Sutar)

Mahadev Jankar
Maratha Reservation : महिलांचा हंबरडा, महाराजांची विनंती अन् हात-पाय घट्ट पकडून लावले सलाईन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com