Satara Constituency : बावनकुळे फलटण दौऱ्यावर तर जयंत पाटलांची श्रीनिवास पाटलांशी बंद दाराआड चर्चा!

Loksabha Election : सातारा लोकसभेसाठी महायुतीसह महाआघाडीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू
Shriniwas Patil and Jayant Patil
Shriniwas Patil and Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara News : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी आपल्या पक्षाची ताकद आणि उमेदवार याची चाचपणी करत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या नियोजित दौऱ्यावर असतानाच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अचानक कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील(Shriniwas Patil) यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेल्या कमराबंद चर्चेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघावरती भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार(Sharad Pawar) या दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. महायुतीमध्ये साताऱ्याची जागा कोणाला मिळणार याबाबत अद्याप नक्की झाले नसले तरी तयारी मात्र सुरू असून इच्छुक उमेदवार ही दावा करू लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shriniwas Patil and Jayant Patil
Murlidhar Mohol : देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा डॉक्टर झाले अन् मुरलीधर मोहोळ त्यांना मुख्यमंत्री करून मोकळे झाले!

अशावेळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी(शरद पवार )कडूनच उमेदवार ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवार गटाकडून सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. राष्ट्रवादी कडून अद्याप उमेदवाराचे नाव निश्चित झाले नाही. तसेच कोणत्याही इच्छुक उमेदवाराने दावाही केला नाही. तरीही खासदार श्रीनिवास पाटील यांचेच नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. तर त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सारंग पाटील यांच्या नावाची ही चर्चा आहे.

अशावेळी राष्ट्रवादीकडे अन्य कोणता पर्याय आहे का? याचीही चाचपणी राष्ट्रवादी कडून सुरू असताना मंगळवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी कराड येथे भेट दिली या भेटीत बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

साताऱ्यातून खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संधी मिळणार की त्यांचा सुपुत्र सारंग पाटील यांची वर्णी लागणार याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गटाकडून बांधला जात आहे? तर काँग्रेसकडूनही सातारा लोकसभा मतदार संघावरती दावा केला गेला आहे.

तेथे पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेचे उमेदवारी द्यावी अशीही मागणी काही दिवसापूर्वी केली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या चर्चेत लोकसभेची चाचणी झाल्याची चर्चा समजत आहे.

Shriniwas Patil and Jayant Patil
11 Bombs Across Mumbai : 'RBI'ला धमकीचा ईमेल ; HDFC, ICICI कार्यालयांसह मुंबईतील 11 ठिकाणांचा उल्लेख!

श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी आजारी असल्याने भेट?

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी माई या आजारी असल्याने ही भेट असल्याचे वरकरणी सांगितले जात आहे. परंतु या भेटीत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यामध्ये कमराबंद चर्चा झाल्याने चर्चेत नक्की काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कमराबंद चर्चेला महत्त्व आले आहे. या भेटीनंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर दोघांच्या भेटीचा फोटो पोस्ट केलेला पाहायला मिळत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com