Loksabha Election 2024 : गावभेट दौरा अर्धवट सोडून प्रणिती शिंदे पोहोचल्या अंत्यसंस्काराला...

Accident शिरनांदगी व चिक्कलगी येथील चौघांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्यावर गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले
Praniti Shinde consoling the relatives of the deceased
Praniti Shinde consoling the relatives of the deceasedsarkarnama

Solapur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संपर्क साधून आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप व विरोधी उमेदवाराकडून सोडली जात नसतानाच आज आमदार प्रणिती शिंदे यांनी दौऱ्यातून चिक्कलगी व शिरनांदगी येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली.

ऊस तोडणीचे काम संपवून गावाकडे परतत असताना रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या धडकेत लगमव्वा हेगडे, रितेश ऐवळे, नीलाबाई ऐवळे, तिघे रा. चिक्कलगी, तर शालनताई खांडेकर, रा. शिरनांदगी या चौघांचा मृत्यू झाला. श्रीदेवी ऐवळे, नकुशा बिरुनगी,जयश्री ऐवळे, बनाव्वा बिरुनगी,लक्ष्मी ऐवळे, महानंदा केंगार ,धानव्वा ऐवले सर्व रा. चिक्कलगी, दत्तात्रय खांडेकर, बंडु बंडगर, दोघे रा. शिरनांदगी जखमी आहेत.

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आज दिवसभर या अपघाताबद्दल तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याशिवाय मयत व जखमी असलेले अतिशय गरीब कुटुंबातील मजूर असून त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी शेती व अन्य कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला. मात्र, गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर मध्यरात्री झोपलेल्या अवस्थेत घाला घातला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde consoling the relatives of the deceased
Solapur Lok Sabha Constituency : दुसऱ्यांच्या मतदारसंघात नाक खुपसण्याचे काम मी करत नाही; प्रणिती शिंदेंचा विरोधकांना टोला

आज झालेल्या अपघातामुळे त्यांच्यासमोर भविष्यातील ही रोजी रोटीचा प्रश्न समोर उभा टाकला आहे. अशा परिस्थितीत सायंकाळच्या दरम्यान चौघांचे मृतदेह त्यांच्याशी शिरनांदगी व चिक्कलगी गावी आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने या भागात फिरत असताना दौरा अर्धवट सोडून मयतांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावत अंत्यसंस्कारानंतर त्यांनी नातेवाईकांचे सांत्वन केले.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com