Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंच्या समोर नरेंद्र पाटील म्हणाले, मला संधी मिळणार आहे; साताऱ्याचा अंतिम निर्णय अजून बाकी....

Satara Loksabha Election : मी तुमच्या समोरच जाहीरपणे सांगतो. आमचे दिल्लीला कोणी नाही. उदयनराजे तुम्ही दिल्लीला गेलात. दहा वर्षे तुम्ही लोकसभेचे नेतृत्व केलेले आहे. तसेच तीन ते चार वर्षे राज्यसभेचे नेतत्व केले आहे.
Satara Loksabha Election
Satara Loksabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : कराड येथील महायुतीच्या मेळाव्यात भाषण करताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Narendra Patil यांच्या पोटातलं ओठावर आलं. खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढेच त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मलाही संधी मिळणार आहे, पण आमचे दिल्लीला कोणी नाही. आमची पोच मुंबईतील सागर बंगला आणि भाजपचे मुंबईतील मुख्य कार्यालय आणि सातारा कार्यालयापर्यंत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या Devendra fadnavis भेटीत मी स्पष्ट सांगितलं की , आपण जो निर्णय घ्याल ताे माझ्यासाठी कायम राहील. पण, महाराज उभे तेथे सगळे आडवे, हा नरेंद्र पाटील तुमच्यासमोर आहे, पण अंतिम निर्णय अजून बाकी आहे, असा सूचक इशाराही त्यांनी उदयनराजेंना दिला. latest polititcal news in satara constituency

नरेंद्र पाटील Narendra Patil म्हणाले, कराडची महायुतीची आजची सभा म्हणजे पेपर फुटला असे म्हणता येईल. शिंदेंची शिवसेना Ekanth Shinde आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप असे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहोत. पंतप्रधानांनी विकासाचा धडाका लावला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचविण्याचे काम नमो ॲपच्या माध्यमातून केले. देशाच्या सीमेची सुरक्षितता वाढवली. देश पातळीवर केलेल्या कामाचा अहवाल देताना उद्याच्या निवडणुकीत सातारकर म्हणून मोठी अपेक्षा आहे. आमच्या या मतदारसंघात उद्या काय बदल होणार आहे, हे मतदारांना समजणे गरजेचे आहे. 2019 च्या निवडणुकीत उदयनराजे Udyanraje Bhosale आणि मी समोरासमोर होतो. आता आम्ही शेजारी बसलो आहोत. सहा महिन्यांनंतर उदयनराजेंनी कठोर निर्णय घेतला. त्यावेळच्या सभेत काका भिजले आणि मतदार फिरले.

Satara Loksabha Election
Satara Loksabha News : मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ जातोच ना ! उदयनराजेंची मार्मिक टिप्पणी

काकांच्या बॅटिंगमुळे जुन्या लोकांनी त्यांना साथ दिली. आता ही कमळाची पहिली निवडणूक लढवली जात आहे. आतापर्यंत शिवसेनेने Shivsena युती असूनही धनुष्यबाणावरच निवडणूक लढवली होती. आपण 2019 विसरलो असलो तरी त्यावेळचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींना विनंती आहे, की येथील मतदार जीव तोडून मतदान करतो. त्यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोचविणे गरजेचे आहे. लोकांचा संपर्क झाला पाहिजे. गावागावांतील प्रश्न सुटले पाहिजेत. या निवडणुकीच्या माध्यमातून मलाही संधी मिळणार आहे. मी असे तुमच्या समोरच जाहीरपणे सांगतो. पण, आमचे दिल्लीला कोणी नाही. उदयनराजे तुम्ही दिल्लीला गेलात. दहा वर्षे तुम्ही लोकसभेचे नेतृत्व केलेले आहे. तसेच तीन ते चार वर्षे राज्यसभेचे नेतत्व केले आहे.

आमचे दिल्लीत कोणीही नाही. आमची ताकद मुंबईतील सागर बंगला आणि भाजपचे BJP मुख्य कार्यालय, सातारा कार्यालय येथेच संपर्क होताे. देवेंद्र फडणवीसांनी Devendra Fadnavis पाच तारखेला वेळ दिली होती. या वेळी तुमचे सहकारी रॉबर्ट उपस्थित होते. फडणवीस साहेबांना रॉबर्ट यांनी काय सांगितले हे मला माहिती नाही. पण मी त्यांना सांगितले साताराबाबत आपण जो निर्णय घ्याल होत निर्णय माझ्यासाठी कायम राहील. काही पत्रकारांनी माझा व्हिडिओ कट करून नरेंद्र विरुद्ध महाराज असे करण्याचा प्रयत्न केला. पण, महाराज उभे तेथे सगळे आडवे. नरेंद्र पाटील तुमच्यासमोर आहेत, पण अंतिम निर्णय अजून बाकी आहे. मी उभा राहणार आहे. पण, नरेंद्र मोदींच्या काळात सातारचा विकास झाला तो नितीन गडकरींच्या माध्यमातून झाला. एकनाथ शिंदेंनी Eknath Shinde जिल्ह्याच्या विकासाला उजवी बाजू दिली आणि शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. देवेंद्र फडणवीससाहेबांनी मराठा आरक्षण देऊन ताकद देण्याचे काम केले. महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाज उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Satara Loksabha Election
Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज अन् मंडलिकांमध्ये 'सामना'; खरी लढत बंटी, मुन्नातच

कराड Karad येथील महायुतीच्या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Narendra Patil बोलत होते. या वेळी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले Udyanraje Bhosale, पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले, आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर, रामचंद्र वेताळ, काकासाहेब जाधव, सुनील काटकर, अक्षय मोहिते, सुलोचना पवार, भीमराव पाटील, सचिन नलवडे आदी उपस्थित होते.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com