Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज अन् मंडलिकांमध्ये 'सामना'; खरी लढत बंटी, मुन्नातच

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध महायुती, अशी थेट लढत आहे. पण...
shahu maharaj | sanjay mandlik | satej patil | satej patil
shahu maharaj | sanjay mandlik | satej patil | satej patilsarkarnama

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपेक्षा त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी त्या निकालापेक्षा कोणत्या नेत्याला धडा मिळाला, याचीच चर्चा होणार आहे. कोल्हापुरात तर काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj ) विरुद्ध शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) असा सामना असला तरी खरी लढत ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील ( Satej Patil ) विरुद्ध भाजप नेते, खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांच्यात असणार आहे.

कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध महायुती, अशी थेट लढत आहे. पण, काँग्रेसकडून उमेदवार असलेले शाहू महाराज ( Shahu Maharaj ) पारंपरिक राजकारणी नाहीत. एका वेगळ्या अर्थाने ते रिंगणात उतरले आहेत. मतदारसंघातील काँग्रेसची ताकद पाहता, शिवसेनेकडून ही जागा काँग्रेसने घेतली. शाहू महाराज यांचे कुठल्या गावात किंवा मतदारसंघात स्वतःचे असे संघटन नाही. त्यांची जी मदार आहे ती काँग्रेस आमदार सतेज पाटील ( Satej Patil ), पी. एन. पाटील या आजी-माजी जिल्हाध्यक्षांवरच आहे. दुसऱ्या बाजूला असलेले प्रा. संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) हे पारंपरिक राजकारणी असले तरी त्यांना उमेदवारी मिळवण्यापासूनच संघर्ष करावा लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कागल मतदारसंघातील त्यांच्या गटाची ताकद सोडली, तर अन्य ठिकाणी त्यांची भिस्त शिवसेना आणि भाजप नेत्यांवरच आहे. त्यातही भाजपची पूर्ण धुरा ज्यांच्यावर आहे त्या खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर यांच्याकडेच आहे. तरीही पारंपरिक प्रतिस्पर्धी महाडिक विरुद्ध सतेज पाटील असेच चित्र उभे राहिले आहे.

हातकणंगलेत महाविकास आघाडीचा उमेदवार द्यायचा की नाही, यावरच गोंधळ सुरू होता. महायुतीच्या उमेदवारालाही विरोध होता. पण, अखेर त्यांची उमेदवारी जाहीर झाली. महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना हक्काचा असा मतदारसंघ किंवा ‘व्होट बँक’ नाही. त्यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब माने यांच्या नावावर जी काही मते मिळतील. पण, बाळासाहेब माने यांनाही जाऊन बराच काळ उलटला आहे, त्यामुळे तो गटही विस्कळीत झाला आहे. त्यातून काही जण काँग्रेसमध्ये, काही अन्य पक्षांत गेले आहेत. त्यामुळे माने यांची भिस्त ही इचलकरंजीतील प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर या आजी-माजी आमदारांवरच असेल.

शिरोळमधून माजी मंत्री राजेंद्र यड्रावकर तर वाळवा, शिराळ्यातील महाडिक गट, पन्हाळ्यातून आमदार डॉ. विनय कोरे यांची त्यांना साथ असेल. याउलट ‘महाविकास’ने दिलेला उमेदवार माजी आमदार आहे. पण, ते कधी लोकसभेचे उमेदवार होतील, अशी शक्यताही नव्हती. सहा मतदारसंघांत त्यांचेही व्यक्तिगत असे काही नाही. त्यामुळेच त्यांची मदार ही परत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिराळ्यातील नाईक बंधू, स्वतःचा मतदारसंघ, त्यांचे वडील, हातकणंगले काँग्रेसचे आमदार राजू आवळे, माजी आमदार राजीव आवळे यांच्यावर असेल. शिरोळ, इचलकरंजीत त्यांच्याकडे तसा प्रभावी गट नसला तरी माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांची साथ मिळेल.

इचलकरंजी व शिरोळमधील काँग्रेसचे गणपतराव पाटील, इचलकरंजीतील जांभळे व शरद पवार गटाची ताकद त्यांच्याच मागे असेल. याउलट ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांच्या मागे नेता कोणी नसला तरी आंदोलनाच्या माध्यमातून अन्य उमेदवारांच्या तुलनेत ते गावोगावी पोहोचले आहेत. दोन वेळा ते खासदार राहिले आहेत. त्यामुळे ते प्रभावशाली नेते राहिले आहेत. या जोरावर ते आव्हान उभे करू शकतात.

shahu maharaj | sanjay mandlik | satej patil | satej patil
Kolhapur Politics : संचालकांची झाली मोठी गोची, सोबतीचे नेतेच झाले एकमेकांचे विरोधक; कुणाच्या मागे जायचं?

कोल्हापूर लोकसभा उमेदवार व नेते

  • शाहू महाराज - प्रा. संजय मंडलिक

  • सतेज पाटील - मंत्री हसन मुश्रीफ

  • पी. एन. पाटील - मंत्री चंद्रकांत पाटील

  • जयश्री जाधव - धनंजय महाडिक

  • ऋतुराज पाटील - आमदार राजेश पाटील

  • संजय घाटगे - प्रकाश आबिटकर

  • सेनेचे संजय पवार - समरजितसिंह घाटगे

  • विजय देवणे - के. पी. पाटील

  • व्ही. बी. पाटील - ए. वाय. पाटील

  • संभाजीराजे छत्रपती - चंद्रदीप नरके

  • मालोजीराजे छत्रपती - बाबासाहेब पाटील, आसुर्लेकर

हातकणंगले लोकसभा उमेदवार व नेते

धैर्यशील माने - सत्यजित पाटील

आमदार डॉ. विनय कोरे - राजू आवळे

प्रकाश आवाडे - उल्हास पाटील

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

सुरेश हाळवणकर - बाबासाहेब पाटील-सरुडकर

वाळव्याचे महाडिक कुटुंबीय - शिराळ्याचे दोन्ही नाईक बंधू

सत्यजित देशमुख - सुजित मिणचेकर

माजी खासदार निवेदिता माने - राजीव आवळे

राजू शेट्टी - स्वाभिमानीचे कार्यकर्ते हीच ताकद

( Edited By : Akshay Sabale )

R

shahu maharaj | sanjay mandlik | satej patil | satej patil
Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com