Pandharpur News, 01 Oct : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यातील मोदीबाग येथे भेट घेतली.
या भेटीमुळे बबनदादा शिंदे हे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आमदार बबनदादा शिंदे यांना पक्षात घेण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP) इच्छुक उमेदवार संजय कोकाटे यांनी, 'जर बबन शिंदे यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचा पराभव करू' अशी मोठी घोषणा केली आहे. आमदार बबनदादा शिंदेंनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर टेंभुर्णी येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला विजयसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करत त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करू, असा पक्षाला इशारा दिला. त्यामुळे आता बबनदादा शिंदे यांना शरद पवार (Sharad Pawar) आपल्या पक्षात घेणार का? आणि घेतल्यास पक्षातील कार्यकर्ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माढ्यातून बबनदादा शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. तर बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनंजय शिंदे यांनीही देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे. घरातूनच आमदार शिंदेंना विरोध असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.