Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली आहे. रविवारी ( 29 सप्टेंबर ) शरद पवार यांची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे सभा पार पडली.
त्याच्या दुसऱ्याच दिवशीच अर्थात सोमवारी बबनदादा शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांतील ही तिसरी भेट असल्यानं आमदार बबनदादा शिंदे 'तुतारी' फुंकणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले गेलेल्या बबनदादा शिंदे यांनी अचानक शरद पवार ( Sharad Pawar ) यांची पुण्यातील त्यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.
यापूर्वी सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत मोदी बागेत आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आमदार बबनदादांनी शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आमदार शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेण्याची ही तिसरी वेळ आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माढ्यात बबनदादा शिंदे ( Babandada Shinde ) यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढविणार असल्याचं बोललं जात आहे. आमदार शिंदे यांचे पुतणे धनंजय शिंदे यांनीही माढ्यातून दंड थोपटले आहेत. तर, अभिजित पाटील हे सुद्धा माढ्यातून निवडणूक लढणार आहेत.
त्यासह लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते-पाटील यांना माढ्यातून मोठं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे मुलाची राजकीय 'इनिंग' कोणत्याही अडथळ्याविना सुरू होण्यासाठी आमदार शिंदे हे शरद पवार यांना भेटत तर नाहीत ना?
अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ते 'तुतारी' फुंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार शिंदे यांनी 'तुतारी' फुंकली तर अजितदादांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.