Dhairyashil Mohite on Ranjitsinh Nimbalkar : 'मी लादलेला उमेदवार नव्हतो' ; धैर्यशील मोहितेंनी रणजितसिंह निंबाळकरांना डिवचलं!

Madha Lok Sabha Constituency : नितीन गडकरींसारख्या मोठ्या व्यक्तीचे नाव उमेदवारीच्या चौथ्या यादीत येते आणि निष्क्रिय लोकांचे नाव पहिल्या यादीत येते ही दुर्दैवी बाब आहे, असा टोलाही लगावला.
Dhairyashil Mohite on Ranjitsinh Nimbalkar
Dhairyashil Mohite on Ranjitsinh NimbalkarSarkarnama

Satara NCP News : माझी उमेदवारी ही जनतेने ठरविलेली आहे.त्यामुळे माझ्या विजयात मतदारसंघातील जनतेचा मोठा वाटा आहे. मी जनतेने ठरविलेला उमदेवार होतो. लादलेला उमेदवार नव्हतो. नितीन गडकरींसारख्या मोठ्या व्यक्तीचे नाव उमेदवारीच्या चौथ्या यादीत येते आणि निष्क्रिय लोकांचे नाव पहिल्या यादीत येते ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका माढाचे खासदर धैर्यशिल मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नामोल्लेख टाळून केली.

खासदार धैर्यशिल मोहिते पाटील(Darhysheel Mohite Patil) यांनी गुरुवारी सातारा राष्ट्रवादी भवनास भेट दिली. यावेळी त्यांचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, डॉ. नितीन सावंत, राजकुमार पाटील, पारिजात दळवी, शहाजीराव क्षीरसागर, दिलिप बाबर, मकरंद बोडके, शफिक शेख, विजय बोबडे, समिंद्रा जाधव, भारती काळंगे, नलिनी जाधव, स्वप्निल वाघमारे, बाळासाहेब शिंदे, उद्धव बाबर, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी यावेळी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, 'राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी मला माढा मतदारसंघातून संधी दिली. माझी उमेदवारी ही जनतेने ठरविलेली आहे. येथील जनतेने आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवारांकडे उमेदवारीचा आग्रह केला होता. त्यानुसार त्यांनी मला उमेदवारी दिली.'

तसेच 'त्यामुळे माझ्या विजयात येथील जनतेचा मोठा वाटा आहे. आता या विजयामुळे माझ्यावर जबाबदारी वाढली असून सोलापूर जिल्ह्यात पक्ष वाढविण्याची प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शरद पवार जी जबाबदारी सोपवतील ती यशस्वीपणे पार पाडणार आहे. माढा मतदारसंघातील सिंचन व रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य असेल.' असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

याचबरोबर 'माण, फलटण मतदारसंघातील जनतेला मी जी आश्वासने निवडणुकीत दिली आहेत त्याचा पाठपुरावा करुन ती पूर्ण केली जातील. तसेच कोरेगाव, फलटण, माण, खटाव, सांगोला, करमाळा, माळशिरस येथील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि काही नवीन प्रकल्पही सुचविणार आहोत.' अशी माहितीही मोहितेंनी यावेळी दिली.

तुम्ही पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली पण, येथील जलनायक म्हणत होते की आमची लाखाने सीट येणार मग इतका फरक का पडला? या प्रश्नावर मोहिते म्हणाले, 'मी जनतेने ठरविलेला उमेदवार होतो, लादलेला उमेदवार नव्हतो. त्यामुळे जनतेने मला साथ दिली, हा त्यांच्यात आमच्यात फरक आहे.

तर मोदींनी पहिल्या यादीत रणजितसिंह निंबाळकर(Ranjitsinh Nimbalkar) यांचे नाव जाहीर केले होते. याबाबत विचारले असता धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, 'गडकरींंसारख्या मोठ्या व्यक्तीचे चौथ्या यादीत नाव होते. त्यांनी कधी मंत्री म्हणून राजकारण केले नाही. येईल त्यांना रस्त्याची कामे सुचवली. कोणत्याही पक्षाचा असून त्यांची कामे त्यांनी मंजूर केली. त्यांचे नाव चौथ्या यादीत येते. पण, निष्क्रिय लोकांचे पहिल्या यादीत नाव येते ही दुर्दैवीबाब आहे. हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते.'

तसेच माणचे आमदार जयकुमार गोरेंना रोखण्यासाठी कोणती रणनिती आखणार यावर ते म्हणाले, प्लॅन कधी सांगायचा नसतो, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

...हे शुभ संकेत आहेत -

माढा लोकसभा मतदारसंघांत(Madha Lok Sabha Constituency) जनतेने निवडणूक हाती घेतल्यामुळे विजय सोपा झाला. आता जबाबदारी वाढली असून निकाल लागल्यापासून आमच्या या दुष्काळी भागात पाऊस कोसळत आहे हे शुभ संकेत आहेत, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com