Madha Lok Sabha Election 2024: शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कोकाटेंचं ठरलं; शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश

Sanjay Kokate Will Join Sharad Pawar Group: कोकाटे यांनी शिवसेनेचा सोडचिठ्ठी दिल्याने माढ्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकला असल्याचे बोलले जाते.
Sanjay Kokate Will Join Sharad Pawar Group
Sanjay Kokate Will Join Sharad Pawar GroupSarkarnama

Solapur News: माढ्यात लोकसभा निवडणुकीच्या (Madha Lok Sabha Constituency 2024) तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसला आहे. माढा शिवसेना संपर्क प्रमुख संजय कोकाटे (Sanjay Kokate) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर माढ्यात महायुतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बबन शिंदे यांच्या विरोधात शड्डू ठोकला...

संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी संजय कोकाटे आपल्या समर्थकांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar)पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याने माढ्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकला असल्याचे बोलले जाते.

Sanjay Kokate Will Join Sharad Pawar Group
MLA Vikram Kale: शिक्षक आमदार विक्रम काळे या वेळी तरी घेणार का खासदारकीचं प्रमोशन?

भाजपकडून तिकिटात डावलल्यानंतरही मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील तालुकानिहाय दौरे सुरूच ठेवले आहेत. ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन केल्याचे समजते. तरीही मोहिते पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सध्या तुतारी हाती घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून माढा निवडणूक लढवतील? अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

मोहिते पाटलांनी अद्याप कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, शरद पवारांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारीवर लढावे, अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले आहे. माढ्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामहरी रुपनवर व माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत माढा लोकसभेला महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करण्याचा ठरावदेखील बैठकीत करण्यात आला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com