Babanrao Shinde: निवडणूक न लढण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदाराला धक्का? दोन कट्टर समर्थकांनी साथ सोडली!

Suraj Deshmukh Raosaheb Deshmukh join Sharad Pawar ncp group: देशमुख बंधुंचा शरद पवार गटात प्रवेश हा माढ्यात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना मोठा धक्का आहे.सुरज देशमुख माढा विधानसभेसाठी प्रमुख दावेदार असल्याची चर्चा आहे.
Madha news
Madha newsSarkarnama
Published on
Updated on

अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.माढा विधानसभेच्या रिंगणातून बबनदादांनी माघार घेतली आहे, पण त्यांचे दोन कट्टर समर्थकांनी त्यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्याच्या फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो. विधानसभेच्या आखाड्यात माढ्यातून या वेळी बबनराव शिंदे नसणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील, असे बोलले जाते.

आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थक सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधुंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला. देशमुख बंधुंचा शरद पवार गटात प्रवेश हा माढ्यात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना मोठा धक्का आहे.

सुरज देशमुख माढा विधानसभेसाठी प्रमुख दावेदार असल्याची चर्चा आहे. माढा विधानसभेसाठी आणखी काही जण इच्छुक आहे, आम्ही चर्चा करुन योग्य उमेदवांची निवड करु, असे जयंत पाटलांनी माध्यमांना सांगितले.

Madha news
Satej Patil: सतेज पाटलांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा बॉम्ब फोडला

माढा विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आलेले अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आपले सुपुत्र रणजीत शिंदे यांना माढ्यातून उमेगृदवारी जाहीर केली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. आता या मतदार संघातून त्यांचे पुत्र रणजीत शिंदे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रचाराला सुरवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com