Madha Politics : मानलं रामराजेंना! इकडं निंबाळकरांना पाडलं, तिकडं अजितदादांच्या बैठकीत पाऊल ठेवलं…

Ramraje Naik Nimbalkar Vs Ranjeetsinh Naik Nimbalkar : माढा लोकसभा निवडणुकीचा उमेदवार भाजपने जाहीर केल्यानंतर रामराजेंनी महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य घसरल्यास आम्हाला विचारून नका, असा दम दिला होता.
Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Ranjeetsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Ranjeetsinh Naik Nimbalkar Sarkarnama

Ramraje Naik Nimbalkar Madha Lok Sabha Election : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीमध्ये सातारा आणि माढा लोकसभेचा समावेश होता. साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले ही विजयी झाले. मात्र माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातातून गेला. माढ्याच्या पराभवाला महायुतीत मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे नेतेच कारणीभूत ठरले.

फलटणचे नेते व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी महायुतीच्या विरोधात काम करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केला आणि गुरुवारी (ता. 6 जून) रोजी मुंबई झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला देखील ते उपस्थित राहिले. रामराजेंच्या या भूमिकेमुळे आता अजित पवारांचा गट चांगलाच बुचकळ्यात पडला आहे. शिवाय युतीधर्म पाळला नाही म्हणून त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

माढा लोकसभेची निवडणूक यावेळी फलटणच्या राजे गटांनी गाजवली. निवडणुकीत पहिल्यांदा रामराजे नाईक निंबाळकर हे आपले बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या साथीने देवेंद्र फडणीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून माढाचे तिकीट मिळवले.

त्यामुळे रामराजेंनी महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य घसरल्यास आम्हाला विचारून नका, असा दमही दिला होता. त्यानंतर रामराजे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. पण त्यांच्या घरातील सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांच्या पराभव करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले. तर दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी प्रचंड प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही.

Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Ranjeetsinh Naik Nimbalkar
Bhavana Gawali : राजश्री पाटलांच्या पराभवानंतर गवळींची खदखद बाहेर; म्हणाल्या, "...तर सहाव्यांदा खासदार झाले असते"

रामराजेंनी निवडणुकीच्या सुरवातीलाच रणजितसिंह निंबाळकर यांना खासदार होऊ न देण्याची शपथ घेतली होती. त्यानुसार रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव झाला. रामराजे आपल्या मनसुब्यात यशस्वी झाले. महायुतीत असूनही त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी महायुतीच्या धोरणाविरोधात काम केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला ते उपस्थित राहिले. त्यामुळे रामराजेंच्या या भूमिकेमुळे भाजप सह अजित पवार राष्ट्रवादीचे नेतेही बुचकळ्यात पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com