Bhavana Gawali : राजश्री पाटलांच्या पराभवानंतर गवळींची खदखद बाहेर; म्हणाल्या, "...तर सहाव्यांदा खासदार झाले असते"

Bhavana Gawali Yavatmal-Washim Lok Sabha Candidacy : "यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची खासदर म्हणून मी मागील 25 वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करत आहे. येथील जनतेने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. प्रत्येक निवडणुकीत माझे मताधिक्य वाढत गेले,पण..."
Bhavna Gawali, Eknath Shinde, Rajshree Patil
Bhavna Gawali, Eknath Shinde, Rajshree PatilSarkarnama

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीतील अनेक इच्छुकांनी मनातील खदखद बोलून दाखवायला सुरुवात केली आहे. यामध्ये माजी खासदार भावना गवळी यांचादेखील समावेश आहे. 'सर्व्हेचे कारण सांगून माझी उमेदवारी नाकारली' अन्यथा मी सहाव्यांदा खासदार झाले असते असं वक्तव्य गवळी यांनी केलं आहे.

लोकसभेच्या निकालापूर्वी भाजपने (BJP) सर्व्हेचे कारण देत शिंदे गटातील अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला. मात्र, याचा फटका महायुताला बसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तिकीट नाकारलेल्या माजी खासदारांना बोलायला बळ मिळालं आहे. याआधी कृपाल तुमाने यांनी आपली खदखद बोलून दाखवल्यानंतर गुरुवारी (ता. 6 जून) रोजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार आणि शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनीदेखील आपली खदखद व्यक्त केली आहे.

भावना गवळी म्हणाल्या, "यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची खासदर म्हणून मी मागील 25 वर्षांपासून या भागाचे प्रतिनिधित्व करत आहे. येथील जनतेने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. प्रत्येक निवडणुकीत माझे मताधिक्य वाढत गेले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मला सहाव्यांदा उमेदवारी मिळाली असती तर, एक लाखाने नव्हे तर दोन लाखांच्या मताधिक्याने मी निवडून आले असते." असा विश्वास व्यक्त करत गवळी यांनी व्यक्त केला.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सहाही विधानसभेवर महायुतीचे आमदार होते. या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेतले होते. मात्र, यावेळी तसं झालं नाही. त्यामळे आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. खासदारकीची उमेदवारी नाकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो मला शब्द दिला, तो दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे योग्य ते पुनर्वसन करतील याची मला खात्री असल्याचंही त्या म्हणाल्या.

Bhavna Gawali, Eknath Shinde, Rajshree Patil
Abdul Sattar On Raosaheb Danve : होय, दानवेंना पाडण्यासाठी काळेंना मदत केली ; अब्दुल सत्तारांनी उघडउघड सांगितले

माझ्या उमेदवारी वेळी सर्व्हेचे कारण सांगून उमेदवारी नाकारण्यात आली. ज्यांनी विजयाची जबाबदारी घेतली त्यांच्याच मतदारसंघात विरोधी उमेदवाराने अधिक मताधिक्य घेतलं. त्यामुळे विधानसभेत आता सर्व्हे करूनच उमेदवारी द्यावी, असा टोला पालकमंत्री संजय राठोड आणि भाजप आमदार मदन येरावार यांच्यावर निशाणा साधला.

कधीकधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे. जनतेच्या काही इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाल्या नाहीत. मात्र आता कोणावर खापर फोडून, एकमेकाला दोष देऊन काही फायदा नाही. परत एकदा एकत्र हातात हात घालून महायुतीला काम करावं लागणार आहे. शिवाय आता यवतमाळच्या जनतेने जो कौल दिला आहे. तो मान्य करावा लागेल, असंही गवळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com