Madha Politics : जो न्याय उदयनराजेंना तोच... मोहिते पाटलांकडून पराभूत झालेल्या निंबाळकरांच्या पुनर्वसनासाठी कोण उतरलं मैदानात?

Ranjitsinha Naik-Nimbalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 1 लाख 20 हजार हून अधिक मताधिक्यानं पराभव केला आहे.
udayanraje bhosale Ranjitsinha Naik Nimbalkar
udayanraje bhosale Ranjitsinha Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Satara BJP News : माढा लोकसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व सहाही आमदार युतीचे आहेत. केवळ नीरा देवघर पाण्याच्या प्रश्नावर राजकीय भांडवल करुन युतीत असूनही आघाडीला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत युती धर्मात गद्दारी करुन पाडले आहे.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsinha Naik-Nimbalkar ) हे क्रियाशील खासदार असून त्यांच्यात विकास कामे करण्याची धमक आहे. पराभव झाला म्हणून ते स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमाणे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे पुनर्वसन करुन त्यांना राज्यसभेवर घ्यावे, असा एकमुखी ठराव सातारा शासकीय विश्रामगृहात झालेल्या भाजपच्या बैठकीत करण्यात आला आहे.

यासंदर्भात भाजपचे ( Bjp ) संघटन महामंत्री मकरंद देशपांडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा ठराव झाला. फलटण तालुका भाजपचे कार्यकर्ते सोपानराव जाधव यांनी हा ठराव मांडला होता.

या ठरावास अनुमोदन देताना फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अनुप शहा म्हणाले, "यापुढील विधानसभा निवडणुकीत युती धर्म न पाळणाऱ्या कोणत्याही आमदाराला मग तो फलटणचा असला तरी त्यालाही आम्ही युती धर्माप्रमाणे मतदान करणार नाही. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत ही गद्दारांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ. ज्या ज्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये युती धर्मातील आमदारांनी कामे केली नाहीत. ज्यांच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना कमी मतदान झालेले आहे. त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपली वेगळी उमेदवारी भरुन त्या जागेवर कमळ चिन्हावर लढण्याची मागणी करतील."

यावेळी सोपानराव जाधव यांनी सांगितले, "माढा लोकसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व सहाही आमदार युतीचे असताना केवळ नीरा देवघर पाण्याच्या प्रश्नावर राजकीय भांडवल करुन युतीत असूनही आघाडीला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत युती धर्मात गद्दारी करुन पाडले आहे."

udayanraje bhosale Ranjitsinha Naik Nimbalkar
Sachin Kalyanshetti Vs Praniti Shinde : ‘प्रणितीताई, शब्द जपून वापरा; आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल’; कल्याणशेट्टींचा इशारा

"रणजितसिंह नाईक निंबाळकर हे क्रियाशील खासदार असून त्यांच्यात विकास काम करण्याची धमक आहे. पराभव झाला म्हणून ते स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमाणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पुनर्वसन करुन त्यांना राज्यसभेवर घ्यावे," अशी मागणी जाधवांनी केली आहे.

udayanraje bhosale Ranjitsinha Naik Nimbalkar
Madha Lok Sabha Constituency : 'रणजितसिंह मोहितेंनी उघडपणे भाजपविरोधात काम केलं, त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा...' ; भाजप पदाधिकाऱ्याचा इशारा!

या बैठकीस सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, फलटण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

(Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com