Madha Lok Sabha Constituency : 'रणजितसिंह मोहितेंनी उघडपणे भाजपविरोधात काम केलं, त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा...' ; भाजप पदाधिकाऱ्याचा इशारा!

Ranjitshinh Mohite Patil and Ranjitshinha Naik Nimbalkar : माढा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने (अजित पवार गट) महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा फलटणमधील भाजपच पदाधिकाऱ्यांचा आरोप
Ranjit Singh Mohite-Patil
Ranjit Singh Mohite-PatilSarkarnama

Satara News : 'माढा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने (अजित पवार गट) महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजप विरोधात काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे निलंबन करावे.' अशी मागणी फलटणमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री मकरंद देशपांडे यांच्याकडे केली आहे.

भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पश्चिम संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजीआमदार मदन भोसले, मनोज घोरपडे, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, प्रिया शिंदे, विठ्ठल बलशेठवार, संतोष कणसे, सागर शिवदास, रणजीत जाधव, विशाल नलवडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Ranjit Singh Mohite-Patil
Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; कारण घ्या जाणून...

यावेळी जयकुमार शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघातील पराभवाची कारणे व भाजप विरोधी काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी लिखित स्वरूपात केली. यावेळी पूर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल ससते शहराध्यक्ष अनुप शहा, ज्येष्ठ नेते विश्वासराव भोसले, गट नेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, संजय गायकवाड, संदीप चोरमले, सोपानराव जाधव, शरद झेंडे उपस्थित होते.

जयकुमार शिंदे म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत चांगले काम केले आहे. कोरोनाचा काळात रखडलेले सर्व प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपने आमदार केलं. त्यांच्या बंद पडलेल्या कारखान्याला मदत केली. त्यांनी उघडपणे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यावर पक्षशिस्तीची कारवाई होऊन त्यांची आमदारकी रद्द करावी. अन्यथा सर्वसामान्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल.'

Ranjit Singh Mohite-Patil
Dhairyashil Mohite on Ranjitsinh Nimbalkar : 'मी लादलेला उमेदवार नव्हतो' ; धैर्यशील मोहितेंनी रणजितसिंह निंबाळकरांना डिवचलं!

तसेच, 'भविष्यात याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील भाजपला आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेवर होईल. फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर व त्यांचे कुटुंबीय व सर्व पदाधिकारी यांनी उघडपणे जाहीररित्या सभा घेऊन महायुतीचा धर्म पाळला नाही.' असंही सांगण्यात आलं आहे.

याशिवाय 'त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आल्यास फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पासून ते आमदारकीपर्यंत सर्व निवडणूक जिंकेल. या दृष्टीने विचार करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना महामंडळ शासकीय कमिटीवर कोठेही त्यांची वर्णी लावू नये.' अशी मागणी करण्यात आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com