Mahadev Jankar In Shirdi : लोकसभेसाठी महादेव जानकर 'अॅक्शनमोड'वर; शिर्डीतून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात

RSP Jan Surajya Yatra : "कुणावरही टीका न करता देशातील नागरिकांशी संवाद साधणार"
Mahadeo Jankar
Mahadeo JankarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. एनडीएतील पक्ष म्हणून सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, तर स्वतंत्र लढण्याचाही जानकरांनी यापूर्वी इशारा दिला आहे. त्यांनी रासप देशात सक्रिय असून बंगळुरू, आसाम, उत्तर प्रदेशातही पक्षाने यश मिळविल्याचे सांगितले आहे. त्यांनी बारामती, परभणी, माढा, मिर्झापूर (उत्तर प्रदेश) या मतदारसंघांची मागणी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर जानकर जन स्वराज्य यात्रेतून राज्यभर शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या यात्रेची शनिवारी शिर्डी मतदारसंघातून सुरुवात झाली आहे. (Latest Political News)

Mahadeo Jankar
Rohit Pawar News : रोहित पवारांनी केलं शाहरुख खानचं कौतुक; म्हणाले, 'जवान'मध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न'

रासपचे महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांची जन स्वराज्य यात्रेस शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सुरुवात झालेली आहे. राहता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती मातेच्या मंदिरात दर्शनाने ही यात्रा राज्यभर फिरणार आहे. या वेळी जानकर म्हणाले, जन स्वराज्य यात्रेनिमित्त दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध गावांतील नागरिकांशी संवाद साधणार आहे. सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षावर टीका करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो, शेतकरी आणि सामान्यांचे काय प्रश्न आहेत, हे जाणून घेण्यासाठी राज्यासह, देशभर ही यात्रा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून (OBC) जानकरांनी दोन्ही समाजाची भूमिका रास्त असल्याचे म्हटले. जानकर म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे. धनगर समाजालाही एस.टी. प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. त्यानुसार समाजाचा रेटा तयार व्हायला हवा. त्यासाठी समाजातून आमदार, खासदारांची संख्या वाढली तर सरकार घाबरते, असे स्पष्ट मत जानकरांनी व्यक्त केले.

जनसुराज्य यात्रेच्या माध्यमातून देशभर ताकद निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जानकरांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या आडून नाव न घेता भाजपवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे माझी बहीण आहेत. त्या सध्या एका जबाबदार पक्षाचे काम करत आहेत. ज्यावेळी बहिणीला खूप त्रास होईल, त्यावेळी त्यांना माहेरच्या झोपडीत घेऊन येईल, असे म्हणत जानकरांनी मुंडेच्या राजकीय भविष्याबाबतही सूचक वक्तव्य केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mahadeo Jankar
OBC Reservation : ओबीसी आंदोलनाची धग पेटली; आंदोलनकर्त्यांनी रोखला चंद्रपूर-नागपूर महामार्ग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com