OBC Reservation : ओबीसी आंदोलनाची धग पेटली; आंदोलनकर्त्यांनी रोखला चंद्रपूर-नागपूर महामार्ग

Maharashtra Politics : ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपुरात गेल्या अकरा सप्टेंबरपासून रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोनल करीत आहेत.
OBC Reservation :
OBC Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Political News : ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपुरात गेल्या अकरा सप्टेंबरपासून रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. काल (22 सप्टेंबर) टोंगेंची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच राज्य सरकार मागण्या मान्य करत नसल्याने व आंदोलनाची दखल घेत नसल्याने संतापलेल्या ओबीसींच्या विविध संघटनांनी चंद्रपूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडला. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हेदेखील आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

OBC Reservation :
Malegaon Sugar Factory : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’चे अध्यक्ष तावरेंऐवजी केशवराव जगताप झाले...

राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची धग पेटली आहे. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ओबीसींकरिता असलेले 72 वसतिगृह तातडीने सुरू करावीत, स्वाधार योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी आदी मागण्यांना घेत चंद्रपुरात ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले; पण या आंदोलनाची शासन व प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली गेली नाही. यामुळे संतापलेल्या ओबीसींच्या विविध संघटनांनी चंद्रपुरात महामोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला.

महामोर्चा निघाल्यानंतर राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. मात्र, या चर्चेतून कुठलाच तोडगा निघाला नाही. मुनगंटीवारांची शिष्टाई अपयशी ठरली. यानंतर ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपुरात मुंडन आणि भीक मांगो आंदोलन करून मनी ऑर्डरने सरकारला रक्कम पाठविण्यात आली.

विविध प्रकारचे आंदोलन करूनही याची अद्यापही दखल का घेतली जात नाही, हा प्रश्न ओबीसी महासंघाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. काल अन्नत्याग आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी मेडिकल काॅलेजमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान, आज संतापलेल्या ओबीसींनी चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलनाची धग पाहता प्रशासनही अलर्टवर होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनीदेखील चक्का जाम आंदोलनात सहभागी होत शासनाचा निषेध केला.

आज चक्काजाम आंदोलन केल्यानंतर उद्या चंद्रपुरात आंदोलन स्थळापासून पालकमंत्री मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आंदोलनाचे अध्यक्ष हंसराज अहिर व स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरापर्यंत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

OBC Reservation :
Rohit Pawar News : रोहित पवारांनी केलं शाहरुख खानचं कौतुक; म्हणाले, 'जवान'मध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com