Mahadevi Elephant Case: कोल्हापूरकरांच्या दबावापुढे 'वनतारा' प्रशासन झुकलं : खासदार माने अन् महाडिकांचे शिष्टाईचे प्रयत्न सुरु

Kolhapur Mahadevi elephant protest: खासदार माने यांच्या पाठपुराव्याने वनतारा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी आणि त्यांचे पथक नांदणीसाठी रवाना झाले आहेत. ते नांदणी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत.
Emotional outcry in Kolhapur as beloved elephant Mahadevi is shifted to Gujarat’s Vanatara rescue center; locals protest with Jio boycott trend.
Emotional outcry in Kolhapur as beloved elephant Mahadevi is shifted to Gujarat’s Vanatara rescue center; locals protest with Jio boycott trend.Sarkarnama
Published on
Updated on

Mahadevi Elephant: कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातमधील अंबानींच्या वनतारा प्राणी कल्याण प्रकल्पात रवानगी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. ग्रामस्थांनी विरोध करीत आंदोलन केले आहे.

महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीला भावपूर्ण निरोप देताना नांदणीकरांचा अक्षरशः अश्रूच्या बांध फुटला होता. खासदार धैयशील माने यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला आहे.

खासदार माने यांच्या पाठपुराव्याने वनतारा प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी आणि त्यांचे पथक नांदणीसाठी रवाना झाले आहेत. ते नांदणी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत.

वनतारा सीईओ विहान करणी, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, जय पेंढारकर, साहिल शेख, अजित कुमार धनी राम सरोज, विजय शितोळे आपल्या पथकासह कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

Emotional outcry in Kolhapur as beloved elephant Mahadevi is shifted to Gujarat’s Vanatara rescue center; locals protest with Jio boycott trend.
Uddhav Thackeray: कोल्हापुरात पहिल्यांदाच ठाकरेंचे 4 जिल्हाप्रमुख आले एकत्र; पाचव्या जिल्हाप्रमुखाचा बार फुसका?

जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यात श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. त्यांना लोकभावना सांगितली. यावर शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सर्वांना चार्टर विमानाची सोय करून दिली. या चर्चेच्या माध्यमातून विषयाचे गांभीर्य धैर्यशील माने यांनी पटवून दिले आहे. मठाचे अधिपतींसोबत चर्चा करून लवकरच तडजोडीचा मार्ग शोधण्यासाठी पथक प्रयत्नशील आहे.

'महादेवी'चे हत्तीचे स्थलांतर

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात हत्ती पाळण्यासंदर्भातील 600 वर्षांपूर्वीची परंपरा आहे. मात्र काही प्राणी संघटनेच्या तक्रारीनंतर न्यायालयाने या महादेवी हत्तीला स्थलांतर करण्याचा निर्णय दिला आहे.

सध्या 'महादेवी'ला गुजरातमधील वनतारा प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नांदनी गावकरांनी आंदोलन केले. महादेवीला घेऊन जात असताना उद्रेक झाला, अनेकांचा अश्रू अनावर झाले.

महादेवी हत्तीण प्रकरणाचा खटला अनेक वर्ष न्यायालयात सुरु होता. पेटाने याबाबत एचपीसीकडं अर्ज केला होता. हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे, तिथून शंकेला सुरुवात होते. एखाद्या प्राण्याची व्यवस्था नीट होत नसेल, तर पेटा त्या संदर्भात आपलं मत मांडत असते. मत मांडताना तो हत्ती गुजरातला गेला पाहिजे, ही भूमिका पेटाने पहिल्यांदा आपल्या याचिकेत घेतली होती. त्यानंतर डॉक्टरांनी येऊन हत्तीची तब्येत चांगली असल्याचा अहवाल दिला, असे असे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सांगितले.

Q1: महादेवी हत्तीणीला कुठे हलवण्यात आले आहे?
A1: गुजरातमधील अंबानींच्या वनतारा प्रकल्पात हलवण्यात आले आहे.

Q2: स्थानिक लोकांनी या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली?
A2: ग्रामस्थांनी भावनिक विरोध दर्शवून आंदोलन केले.

Q3: या प्रकरणात कोण पुढाकार घेत आहेत?
A3: खासदार धैर्यशील माने आणि धनंजय महाडिक यांनी सक्रिय हस्तक्षेप केला.

Q4: पुढील टप्प्यावर काय प्रयत्न सुरू आहेत?
A4: मठाशी चर्चा करून तडजोडीचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com