Mahadevi Elephant News: 'महादेवी' हत्तीण पुन्हा नांंदणीत येणार? 'वनतारा'चा लवकरच मोठा निर्णय

Mahadevi Elephant Kolhapur : नांदणी मठाचे मठाधिपती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या बैठकीतून अचानक बाहेर पडले. या निर्णयाने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ते नक्की का बाहेर पडले याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
Mahadevi Elephant Case
Mahadevi Elephant CaseSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महादेवी (माधुरी) हत्तीण संदर्भातील घटनांमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. परंपरेला धक्का बसल्याने जैन समाज आणि कोल्हापूरकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यानी भूमिका मांडली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, पेठाकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हत्ती महादेवी (माधुरी) बाबत सुप्रीम कोर्टात निर्णय देण्यात आला. या निर्णयामुळे कोल्हापूरची जुनी परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि भावनिक नाळ तोडल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना आहे.

या प्रकरणात खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री व वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला. तसेच वनतारा (वन्यजीव प्रकल्प) टीम सोबत देखील सविस्तर चर्चा झाली. कोल्हापूरकरांची भावना, श्रद्धा, आणि परंपरेचा इतिहास याबाबत वनताराला समजावून सांगण्यात आले.

वनतारा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, "सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच माधुरी आमच्या ताब्यात आली आहे. मात्र, कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत." वनताराचे वरिष्ठ अधिकारी (SEO) यांनी हत्ती परत देण्यास सकारात्मक भूमिका घेतली असून, "कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हत्ती परत दिला जाईल," असे सांगण्यात आले.

Mahadevi Elephant Case
Daund Riots: गोपीचंद पडळकरांच्या मोर्चानंतर यवत पेटलं, दोन गटात राडा; तुफान दगडफेक,जाळपोळ; पोलिसांची मोठी कारवाई

ही घटना कोल्हापूरच्या जनतेच्या श्रद्धेशी निगडित आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही विरोध करत नाही, परंतु त्या निर्णयात लोकभावनांचा विचार झाला नाही. त्यामुळे हत्तीला परत आणण्यासाठी सरकारकडून शपथपत्र (Affidavit) सादर केला जाणार आहे आणि केंद्र सरकार, राज्य शासन व वन विभागाच्या सहकार्याने सुप्रीम कोर्टात पूर्ण ताकदीने आम्ही लढा देणार आहोत.

नांदणी मठाचे मठाधिपती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या बैठकीतून अचानक बाहेर पडले. या निर्णयाने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ते नक्की का बाहेर पडले याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, स्वामीजींनी स्पष्ट शब्दांत बोलण्यास नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com