Satej Patil on Rajaram Factory : सभासदांना फसवून महाडिकांचा 'राजाराम'च्या खासगीकरणाचा घाट : सतेज पाटलांचा गंभीर आरोप

Mahadik-Patil Politics : राजाराम कारखान्याचं कार्यक्षेत्र हे सहा तालुक्यांतील कार्यक्षेत्र आहे.
Mahadik-Patil Politics
Mahadik-Patil Politics Sarkarnama

Kolhapur Political News: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा महाडिक गटावर हल्लाबोल केला आहे. पोटनियम बदलून महाडिक राजाराम कारखाना खासगी करण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांवर केला आहे. 'केएमटी'च्या ताफ्यात आलेल्या नवीन नऊ वातानूकुलित बसेसच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.

आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या फंडातून घेण्यात आलेल्या तीन कोटी १५ लाख रुपयांच्या या वातानुकूलित बसेस पहिल्यांदाच शहरातून धावणार आहेत. याचा शुभारंभ नुकताच पार पडला. सतेज पाटील म्हणाले, राजाराम कारखान्याचं कार्यक्षेत्र हे सहा तालुक्यांतील आहे. त्यामुळे वार्षिक सभेची वेळ एक वाजल्यापासून ठेवावी अशी मागणी आहे. तसेच पोटनियमातही बदल होत आहे. जे १२०० सभासद कमी झाले, तोच नियम आजही लागू आहे. लीजवर जमीन दिली तरी तो सभासद होतो, असे असेल तर राजाराम कारखान्याचे खासगीकरणाचाच ठराव करा, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

Mahadik-Patil Politics
Dispute In Kolhapur BJP : ‘भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंतांची फरफट होतेय’; माजी जिल्हाध्यक्षांनी नाराजांना वाट मोकळी केली

तसेच सभासदांची फसवणूक करण्यापेक्षा कारखाना थेट खासगीच करून टाका, असा घणाघातही त्यांनी केला आहे. 'कोण काय बोलतंय याकडे आम्ही लक्ष देणार नाही. आमचं दायित्व जनतेप्रती आहे. हेच दायित्व यापुढील काळातही प्रामाणिकपणे पार पाहू,' असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावरदेखील नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्ह्यातील आमदारांना विश्वासात न घेता काम करत आहेत. आमदार हा एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो; पण पालकमंत्र्यांना वारंवार भेटूनही त्यांनी निधी दिला नाही. पण अलीकडे पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निधी देण्याचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी सुचवतोय त्याप्रमाणे डीपीडीसीचा निधी द्यावा, असे आम्ही पालकमंत्र्यांना सुचवले होते.

श्री अंबाबाई विकास आराखडा आमदारांना न दाखवता मंजूर करण्याचा घाट घातला आहे. लोकांना विकास आराखडा दाखवा मगच मंजूर करा. यात काही बदल केले आहेत का, बदल केले असतील तर कोल्हापूरच्या जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या मंजुरीने हा बदल व्हायला हवा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. आराखडा झालाच पाहिजे, निधीही आलाच पाहिजे, याबद्दल आमचे दुमत नाही, पण हे सर्व कोल्हापूरकरांच्या संमतीने व्हावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जनतेसाठी असते, गणशोत्सवाच्या निमित्ताने या वातानुकूलित बसेस कोल्हापूरच्या नागरिकांच्या सेवेत रुजू होतील.

Edited By- Anuradha Dhawade

Mahadik-Patil Politics
Ahmednagar Politics : शिर्डीत पार पडणार शरद पवार गटाचे राज्यव्यापी शिबिर; रणनीती काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com