Assembly Election 2024 : राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर होताच बंडखोरांची एकी? करेक्ट कार्यक्रम होणार...

Ichalkaranji Assembly Constituency Rahul Awade BJP Candidate : इचलकरंजी मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीतील बंडखोरांनी देखील गुप्त व्यूहरचना आखण्याचे काम सुरू केले आहे.
Rahul Awade
Rahul AwadeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र आवाडे यांच्या उमेदवारीनंतर नाराज आणि बंडखोरांच्या गुप्ता हालचाली सुरू झाली आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीसमोर तिसरा पर्याय देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. इचलकरंजी मतदारसंघातून युती आणि आघाडीमधील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता बंडखोरांनी देखील गुप्त व्यूहरचना आखण्याचे काम सुरू केले आहे.

Rahul Awade
Ajit Pawar : अजितदादांचा ठाकरेंना मोठा धक्का; पुण्याच्या जिल्हाप्रमुखांनाच फोडले

आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नाराज झालेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी बंड पुकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत अपक्ष निवडणूक लढवणार, यावर ते ठाम आहेत. त्यातच भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर इचलकरंजी मध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. आवाडे यांच्या उमेदवारीमुळे शेळके यांच्या उमेदवारीची दारे बंद झाली आहेत.

महाविकास आघाडीतून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अनेक इच्छुक रांगेत उभे आहेत. आघाडीकडून मदन कारंडे यांना उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. अशावेळी दोन्ही उमेदवारांच्या समोर तिसरा पर्याय देता येतो काय, याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याची गुप्त खलबते सुरू आहेत. तिसरा पर्याय दिल्यास आपल्यासोबत विविध पक्षांतून कोणकोण येणार, यावर खल सुरू आहे.

Rahul Awade
Chandgad Assembly Election : शरद पवारांच्या उमेदवाराला विरोध; आघाडीत बिघाडी?

नुकत्याच झालेल्या एका गुप्त बैठकीत एकाचे नाव समोर आले आहे. नाराजांकडून या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवसात मोठ्या घडामोडी घडण्याचा अंदाज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील काळात सक्षम तिसरा पर्याय समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com