Ajit Pawar : अजित पवारांकडून फलटणचा उमेदवार जाहीर; रामराजेंनी स्टेजवरूनच फोन लावला...

Maharashtra Assembly Election 2024 Phaltan Constituency Deepak Chavan : फलटण विधानसभा मतदारसंघात सध्या दीपक चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत.
Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit Pawar
Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Phaltan News : महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फोनवरून अजितदादांनी एका कार्यक्रमात उमेदवाराची घोषणा केली.

फलटण मतदारसंघात दीपक चव्हाण हे विद्यमान आमदार असून दादांनी पुन्हा त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. मतदारसंघातील सोळशी येथील एका कार्यक्रमात चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून चव्हाण हे तीनवेळा निवडून आले आहेत.

Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit Pawar
Supriya Sule: तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुम्हाला सौ खून माफ; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा

सोळशी ग्रामपंचायतीच्या उदघाटनप्रसंगी अजित पवार यांना उपस्थित राहता आले नाही. त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फोनवरून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यानच त्यांनी चव्हाण हे उमेदवार असतील, हे जाहीर केले. फलटण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार आहोत. दीपक चव्हाण हे उमेदवार आहेत, असे अजितदादा म्हणाले.

दीपक चव्हाण हे रामराजेंचे कट्टर समर्थक मानले जातात. लोकसभा निवडणुकीत रामराजेंनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारातून अंग काढून घेतले होते. त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. रामराजेंच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. त्यामुळे फलटण राजकीय संघर्षात उमेदवारी कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली होती.

Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit Pawar
Ahmednagar Politics : इम्तियाज जलीलांना भेटताच, परवेज अशरफींनी नगरच्या आमदारकीविषयी तोफ डागली

रामराजे यांनी यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. थेट अजितदादांनीच उमेदवार जाहीर केल्याने उपस्थितही अवाक झाले. तसेच रामराजेंसह दीपक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले. दीपक चव्हाण यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही दादांनी मतदारांना केले.

चव्हाणांच्या विरोधात कोण?

महाविकास आघाडीमध्ये फलटण मतदारसंघ शरद पवारांकडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दीपक चव्हाण यांच्याविरोधात कुणाला तिकीट दिले जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. फलटण हा रामराजेंचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे थेट रामराजेंना शह देण्यासाठी शरद पवार कोणती खेळी खेळणार, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com