Farmer Loan Waiver : लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पण 'या' शेतकऱ्यांना बसणार थेट फटका; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची कर्जमाफीवर महत्त्वाची माहिती

Dattatray Bharne On Maharashtra Farmers Loan Waiver : कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharne
Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharnesarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. ३० जुलैआधी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला जाईल, असे संकेत सरकारकडून दिले जात होते. त्यानुसार आता राज्य सरकारकडून कर्जमाफीसंदर्भात जलद गतीने हालचाली सुरू असून, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशातच राज्यातील इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे पुन्हा एकदा सरकारने जाहीर केले आहे.

कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्जमाफीच्या यादीसह कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही याचीही सविस्तर आणि महत्त्वाची माहिती दिली.

यादी जाहीर होण्यास झालेल्या विलंबाबाबत बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर ३० जून ही तारीख आपल्या सर्वांना दिली होती. परंतु, ही यादी पूर्णपणे अचूक असली पाहिजे आणि एकदा यादी जाहीर केल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला पुन्हा अडचणींना सामोरे जावे लागू नये, हा आमचा मुख्य उद्देश होता.

Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharne
Dattatray Bharne : लग्न जुळत नसल्याने तरूण शेतकऱ्याचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन; म्हणाला, "पाऊस नाही, पिके नाहीत..."

तसेच, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेणे आणि त्यानंतर राज्यपाल महोदयांची त्यावर स्वाक्षरी होणे, या वैधानिक प्रक्रियेमुळे थोडा उशीर झाला. पहिली यादी जाहीर करण्यात उशीर झाल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले.

भरणे पुढे म्हणाले, राज्यातील जे मोठे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, त्यांना बाजूला ठेवून केवळ अडचणीत असलेल्या गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे, हा सरकारचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. केंद्राकडून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी यादी दोन-तीन दिवसांपूर्वीच प्राप्त झाली आहे. त्यानुसार आता यादीवर कामकाज सुरू आहे.

Maharashtra Farmers Loan Waiver; Dattatray Bharne
Dattatray Bharne Targets CJP : कॉक्रोच जनता पार्टी’वर दत्ता भरणेंचा टोला; इंटरनेटवर पक्ष चालवणं आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळं!

३० जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा होणार

भरणे म्हणाले, सध्या सहकार मंत्री आणि सहकार सचिव यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आज प्राथमिक स्वरूपातील पहिली यादी निश्चितपणे समोर येईल. त्याबाबतची प्रक्रिया आता पूर्ण वेगाने सुरू झाली असून, साधारणतः ३० जुलैपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यावर कर्जमाफीची संपूर्ण रक्कम जमा केली जाईल, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com