
Black Flags Shown to Maharashtra CM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज(शुक्रवार) सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपवून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत, सांगली-कोल्हापूर महामार्गावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतक-यांचे संपूर्ण कर्जमाफ करू असे जाहीरनाम्यात सांगितले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करता येणार नाही अशी वल्गना करत असल्याने, सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे. असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हातकंणगले तालुक्यातील मजले येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
राज्यात दररोज आठ पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. विधानसभा निवडणुका संपून जवळपास आठ महिने झाले तरीही सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही, असे स्वाभिमानीचे म्हणणे आहेत.
तसेच होऊ घातल्या शक्तिपीठ महामार्गाचा फटका सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना बसणार आहे. महापुरातस देखील कारणीभूत हा रस्ता ठरणार आहे, यासाठी शक्तिपीठ महामार्ग रद्द करा ही मागणी देखील वेळोवेळी केली आहे. यासाठी आंदोलनाची तीव्रता अधिक वाढविण्यात येणार आहे. असा इशाराही दिला गेला आहे.
दरम्यान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपुर्ण कर्जमाफी करावे अन्यथा संपुर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.