आढळरावांनी निवडणुकीची तयारी सुरू केली : बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या ११७ शाखाप्रमुखांची नियुक्ती

मागील लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी मतदारसंघाची बांधणी त्यांनी सुरू केली आहे.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघात पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी मतदारसंघाची बांधणी त्यांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिरूर तालुक्यात सल्लागार, समन्वयक, उपतालुकाप्रमुख यांच्यासह ११७ नव्या शाखाप्रमुखांची नियुक्ती करत आढळरावांनी बाळासाहेबांची शिवसेना मतदारसंघात रुजविण्याचे काम हाती घेतले आहे. (Shivajirao Adharao Patil started preparations for the Lok Sabha elections in Shirur)

मागील लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांची पराभव केला होता. सलग तीनवेळा निवडून आलेले आढळराव यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का होता. पण, या धक्कातून सावरून त्यांनी गेल्या अडीच वर्षांत आपला जनता दरबार कायम ठेवला हेाता. मतदारांशी असलेला संपर्क त्यांनी कायम ठेवला होता.

Shivajirao Adhalrao Patil
शहाजीबापू पाटलांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना मराठीसह इंग्रजीतून ऐकविला ‘काय झाडी...’ डायलॉग

लोकसभा निवडणुकीला आणखी दोन वर्षांचा अवकाश असला तरी आढळराव यांनी आता पहिल्यापासून पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात ११७ नव्या शाखाप्रमुखांची नियुक्ती त्यांनी केली आहे. पक्षविस्तारासाठी ही बाब महत्वाची ठरणार आहे. शिरूर तालुक्यातील ११७ शाखाप्रमुखांना तालुकाप्रमुख राम सासवडे आणि उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद यांच्या उपस्थितीत लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे नुकतीच नियुक्तीपत्रे वाटप केली आहेत.

Shivajirao Adhalrao Patil
‘उद्धव ठाकरेंनी घेतलेली ती शपथ राज ठाकरेंना आजही वेदना देते’

नव्यानेच अस्तित्वात आलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला तळागाळात नेण्यासाठी आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यासाठी ११७ जणांच्या शाखाप्रमुखांची निवड जाहीर केली आहे. या माध्यमातून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला गावागावापर्यंत नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. एकनाथ लांडगे, सुनील शिवले, दत्तात्रेय टेमगिरे, विजय सातकर, धनंजय टाकळकर, भगवान शिंदे, योगेश भांड, अमोल जैकर, अर्जुन काळे, नितीन अवचिते, अशोक घोलप, निलेश भोसुरे, अमोल दरेकर, संपत गव्हाणे, मनोज कांबळे, गणेश भोकरे, शुभम दौंडकर, महेश काशिद, नवनाथ गव्हाणे, सचिन गव्हाणे, सतिश वाखारे, विशाल पवार, हंबीर लंगे, स्वप्निल कुरुंदळे, गणेश सपकाळ, मयूर डोंगरे यांच्यासह तब्बल ११७ शाखा प्रमुखांना या वेळी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

Shivajirao Adhalrao Patil
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे : नीलम गोऱ्हेंनी साधला निशाणा

बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिरुर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी ही राम सासवडे, तर उपजिल्हाप्रमुखपद अनिल काशिद यांच्याकडे अगोदरच सोपविण्यात आले आहे. त्यांच्या जोडीला आता रोहीदास शिवले (जिल्हा सल्लागार), आण्णा हजारे (जिल्हा समन्वक), दत्ता गिलबीले व बापूसाहेब मासळकर (तालुका समन्वयक), गणेश कोतवाल, संपत कापरे, सागर दरेकर, संतोष वरपे, माऊली फराटे, हरिभाऊ भंडारे, शरद नवले (उपतालुकाप्रमुख), दादा काशिद, महेश ढमढेरे (उपविभागप्रमुख), बापु भंडलकर, बाबु ढमढेरे, दशरथ नागवडे, सचिन सासवडे, महेश मासळकर (विभागप्रमुख) यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

सम्राट ढेरंगे व सुरेश काळे यांची कोरेगाव भीमा उपशहरप्रमुखपदी, तर हर्षवर्धन दोरगे, ज्ञानेश्वर राऊत, मंगेश चव्हाण, संजय पवार, विकास मासळकर, दिनेश राऊत यांची शिक्रापूर उपशहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. सणसवाडी उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी भाऊसाहेब हरगुडे, गोरक्ष मोरे, चंद्रकांत हरगुडे, मोहन दरेकर,किरण हरगुडे, रामदास हरगुडे, गणेश दरेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com