Rahul Awade: 'स्थानिक' निवडणुका बॅलेट पेपरवर होणार? भाजप आमदाराचा दावा

Rahul Awade claims local body elections will be held on ballot paper: ईव्हीएम मशीनवर सातत्याने शंका घेतल्या जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात येणार असल्याचा दावा आता महायुतीतील भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी केला आहे.
MLA Rahul Awade
MLA Rahul AwadeSarkarnama
Published on
Updated on
  1. राहुल आवाडेंनी दावा केला की निवडणुका बॅलेट पेपरवर होणार आहेत.

  2. त्यांनी विरोधकांवर उमेदवारांच्या कमतरतेबाबत टीका केली.

  3. मतदारांना कच्च्या मतदार यादीत नाव तपासण्याचे आवाहन केले.

kolhapur News: विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर ईव्हीएम मशीन वर अनेकांनी शंका उपस्थित केल्या. सातत्याने शंका उपस्थितीत होत असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काही विरोधकांनी केली आहे. आता मात्र महायुतीतील भाजपच्याच आमदाराने आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर होतील असा छाती ठोकपणे दावा केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आवाडे यांनी हा दावा केला आहे.

इचलकरंजी मतदारसंघातील एका कार्यक्रमानिमित्त भाजप नेते आमदार राहुल आवाडे यांनी याबाबत भाष्य केला आहे. "आगामी निवडणुकीचे मतदान ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर होणार आहे," असा दावा आमदार राहुल आवाडे यांनी केला आहे. या संदर्भात जाहीर होणाऱ्या कच्च्या मतदार यादीमध्ये आपले नाव नीट तपासा. निवडणुकीनंतर मतचोरी झाल्याचा आरोप करू नका, असा टोला देखील यावेळी विरोधकांना आमदार आवाडे यांनी लगावला.

MLA Rahul Awade
Priyanka Gandhi: बिहारच्या रिंगणात आता प्रियंका गांधींची एन्ट्री! काँग्रेसची मोठी रणनीती

आगामी महापालिका निवडणुकीनिमित्ताने मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन सुरू असताना राहुल आवाडे यांनी थेट उमेदवारांचीच घोषणा करत सर्व ६४ जागांवर ताकदीचे उमेदवार आहेत. विरोधकांकड़े उमेदवार नाहीत. काही उमेदवारांना नवरा- बायको असे दोन मतदारसंघात उमेदवारी घ्या, म्हणून तयार करत आहेत. अशी विरोधकांची परिस्थिती आहे. निकालानंतर आपल्यावर मतचोरीचा विरोधक आरोप करतात. पण यावेळी मतदान हे आता मशीनवर न होता बॅलेट पेपरवर होणार आहे. त्यामुळे मशीन मॅनेज केल्याचा आरोप होणार नाही, असेही आवाडे म्हणाले.

MLA Rahul Awade
Sunil Shelke: अजितदादांचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्या कटप्रकरणी एसआयटीची स्थापना

राहुल आवाडे यांचा दावा

"आगामी निवडणुकीचे मतदान ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर होणार आहे. मतदारांनी कच्च्या मतदार यादीत आपले नाव नीट तपासावे. निवडणुकीनंतर मतचोरीचा आरोप करण्याऐवजी आधी तयारी करावी."

विरोधकांवर जोरदार टीका

विरोधकांकडे ताकदीचे उमेदवार नाहीत.

काही ठिकाणी नवरा-बायकोला दोन मतदारसंघात उमेदवारी द्यावी लागत आहे.

निकाल लागल्यानंतर विरोधक नेहमीप्रमाणे "मतचोरी"चा आरोप करतात.

यावेळी वाद नको!

आवाडेंनी स्पष्ट केले की मतदान बॅलेट पेपरवर होणार असल्यामुळे मशीन मॅनेज केल्याचे आरोप यावेळी होणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com