महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नगरमध्ये वाटले भोंगे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत केलेल्या भाषणानंतर राज्यभर मनसे आक्रमक झाली आहे.
Sumit Varma MNS
Sumit Varma MNSSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत केलेल्या भाषणानंतर राज्यभर मनसे आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत अहमदनगर जिल्ह्यामध्ये भोंगे वाटप करण्यात आले. ( Maharashtra Navnirman Vidyarthi Sena felt the buzz in Ahmednagar )

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी शहरासह नगर तालुक्यातील काही धार्मिक स्थळांना भोंगे वाटप केले. 18 भोंगे वाटले अशी माहिती सुमित वर्मा यांनी दिले ते म्हणाले की, धार्मिकता व हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच पुढाकार घेईन, आतापर्यंत 40 पेक्षा जास्त भोंगे वाटप केले असून, यापुढे जिल्हाभर भोंगे वाटपाचा कार्यक्रम राबविणार जाईल असे सुमीत वर्मा यांनी सांगितले.

Sumit Varma MNS
पवार, राऊतांच्या टीकेला राज ठाकरे देणार 'करारा जबाब' ; मनसेचा टीझर रिलीज

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अहमदनगर शहर व तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांना भोंग्याचे वाटप करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा, तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संकेत जरे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.

Sumit Varma MNS
बाळा नांदगावकरांनी संजय राऊतांवर केली उपरोधिक टीका, म्हणाले...

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या पक्ष मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत वक्तव्य केले होते. मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चाळीसा वाजवू, असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. मनसेमधील हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अहमदनगर देखील राज ठाकरे यांच्या या भाषणाचे पडसाद उमटले आहेत. मनसेने अहमदनगरमध्ये आक्रमक भूमिका घेत हिंदूंच्या धार्मिकस्थळांसाठी भोंगे वाटप सुरू केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com