निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत नाराजीचा लेटरबॉम्ब : आमदार बनसोडेंना डावलले जात असल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
NCP-Anna Bansode
NCP-Anna BansodeSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-chinchwad) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) एकमेव आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) हे पक्षाचे कार्यक्रम आणि बैठकांना हजेरी लावत नसल्याने त्यांच्याबाबत वेगळीच चर्चा रंगली होती. अण्णांच्या मनात चाललंय काय इथपासून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे मीडियात बोलले गेले. मात्र, त्यांनाच नव्हे; तर राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय पदाधिकाऱ्यांनाही शहर पातळीवर डावलले जात असल्याचा लेटरबॉम्ब पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसरमल यांनी बुधवारी (ता. २६ ऑक्टोबर) जाहीरपणे फोडला. त्यातून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. (Letter bomb of displeasure in Pimpri NCP)

सुमारे आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या पिंपरी पालिकेची निवडणूक या वर्षअखेरीस वा पुढील वर्षाच्या सुरवातीस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सत्ताधारी भाजपने नवा सवंगडी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मदतीने या निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडीबाबत अद्याप चर्चाच नाही.

NCP-Anna Bansode
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच खर्गेंनी मोदी-शहांच्या गुजरातमध्ये लक्ष घातले : १२५ उमेदवार केले निश्चित

त्या पार्श्वभूमीवर परवा झालेल्या शहर राष्ट्रवादीच्या मासिक बैठकीनंतर काल औसरमल यांची ही खदखद बाहेर पडली. त्यांनी ती फेसबुकवर व्यक्त केली. त्याव्दारे त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना खुले पत्र लिहित काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार बनसोडे यांच्या मतदारसंघात झालेल्या पक्षाच्या मासिक बैठकीत त्यांनाच डावलण्यात आले. त्यांचा फोटोही बैठकीच्या बॅनरवर नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

NCP-Anna Bansode
त्यानंतर मी रामदास कदमांवर बोलायचे सोडून दिले आहे : आदित्य ठाकरेंचा हल्लोबाल

सर्व सेलध्याक्ष या बैठकीला स्टेजवर होते. अपवाद फक्त अनुसूचित जमाती सेल अध्यक्षांचा होता. त्यांचा नामोल्लेखही केला गेला नाही, या कडे त्यांनी लक्ष वेधले. आमदार बनसोडेंना पक्षात सतत अपमानास्पद वागणूक दिली जाते. या सर्व बाबी पक्ष विचारसरणीच्या विरोधात आहेत, त्यामुळे पक्ष जाणूनबुजून जातीवाद, तर करत नाही ना, अशी चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे. ती आपल्यापर्यंत पोचवणे क्रमप्राप्त वाटले; म्हणून हे पत्र लिहण्याचे धाडस केले. आपण पक्षाची प्रतिमा जातीवादी, सरंजामी होऊ देणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी अध्यक्षांकडे व्यक्त केली आहे.

NCP-Anna Bansode
Cabinet Expansion : शिरसाट, गोगावले, बच्चू कडू यांना मंत्रिपदे निश्चित? : भाजप अन्‌ शिंदे गटाकडून प्रत्येकी चौघांना संधी

आमदार बनसोडेंसह सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्याना, अनुसूचित जमातीच्या पदाधिकाऱ्यांना शहर पक्षात वेगळी वागणूक दिली जाते. त्यांना जाणूनबुजून कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचे काम सातत्याने सुरू आहे, असा आरोप या व्हायरल पत्रात केला गेला आहे. शहर पक्ष कार्यालयातही आमदार बनसोडेंचा फोटो व नाव नसल्याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले आहे.

NCP-Anna Bansode
माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्‌दयविकाराने निधन

आमदार बनसोडे व मागासवर्गीय पदाधिकाऱ्याची जाणीवपूर्वक हेळसांड करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. ही भावना दूर करण्यासाठी अध्यक्ष म्हणून तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही गव्हाणेंना देण्यात आला आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो, ही शिकवण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीचा मार्गाचा अवलंब करत रहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला असल्याने हिमतीने हे पत्र आपणास लिहले आहे, असे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, या पत्रानंतर औसरमल यांच्याशी लगेच बोलणे केले असून पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गव्हाणे यांनी ‘सरकारनामा’ला या संदर्भात सांगितले. तसेच काही चुका झाल्या असतील, तर त्या ही दुरुस्त करू, असे ते म्हणाले. याअगोदरच्या राष्ट्रवादीच्या शहर पक्ष कार्यकारिणीत व त्यातही सेल अध्यक्ष हे बहूतांश मराठाच असल्याबद्दल थेट शरद पवारांकडे तक्रार गेली होती. त्यानंतर त्यात थोडा बदल होऊन अल्पसंख्याकांसह इतर जातींना त्यात आता स्थान देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com