
Nagpur News: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घण हत्येचे प्रकरण गाजत असतानाचा नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील एका ग्रामपंचायत सदस्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली.
यामुळे नागपूर ग्रामीणमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांचा पती आहे. तो सरपंच असून माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा कट्टर समर्थक आहे. त्यामुळे भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. ही घटना राजकीय आणि व्यावसायिक समन्वयातून घडल्याचे समजते.
मृत अतुल पाटील हा भाजपचे पदाधिकारी किशोर चौधरी यांचा निकटचा कार्यकर्ता होता. या घटनेनंतर पिपळा येथे वातावरण तणावपूर्ण झाले आहे. चौधरी यांनी समर्थकांसह निदर्शने करीत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली. आ
मदार डॉ. आशिष देशमुख, मनोहर कुंभारे, किशोर चौधरी, बबलू ठाकूर, विलास महल्ले यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आंदोलनाचा हजेरी लावली. यामुळे गावात तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचे शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे.
आरोपी केदारांचे समर्थक असल्याने भाजपचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. अतुल तुळशीराम पाटील हा ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष निवडूण आला होता. त्याचा रेतीचा व्यवसाय होता. यावरून त्याचे राजकीय प्रतिस्पर्धी हिमांशू कुंभलकर आणि विष्णू कोकड्डे यांच्याशी वैर होते. त्यांच्या रेतीची वाहतूक आणि पैशावरून नेहमीच वाद होत होते.
अतुल हा आपल्याविरुद्ध पोलिसांना टीप देत असल्याची शंका हिमांशूला होती. यावरून त्याने अतुलला बघून घेण्याची धमकी दिली होती. अतुलकडे स्वतःचा ट्रॅक्टर होता. तो रेती घाटवरून अवैध रेतीची उचल करून विकत होता. यावरून सोमवारी दोघांमध्ये वाद झाला होता. रात्री हिमांशूने अतुलला फोन करून भेटीसाठी बोलावले. अतुल मित्रासोबत वलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या टी पॉइंटवर गेला. तिथे आरोपी हिमांशू वाट पाहत होता.
त्यानंतर दोघेच अतुलच्या दुचाकीवरून पिपळा (डाक बंगला) येथील कार वॉशिंग सेंटरकडे गेले. तिथेच हिमांशूने ‘पोलिसांची मूखबिरी’ केल्याचा आरोप करीत अतुलवर धारदार चाकूने सपासप वार केले. गळा, छाती व मांडीवर सहा ते सात वार केले. त्यानंतर दगडाने डोक्यावर मारून त्याचा खून केला.
खून केल्यानंतर आरोपी हिमांशू सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात स्वतःच गेला. तिथे डॉक्टरांना घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी सरपंच विष्णू कोकड्डे यालाही राहत्या घरून अटक केली. कोकड्डे यानेच खून करण्यासाठी आरोपीला चिथवल्याचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.