साखर आयुक्त म्हणतात, इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्राची आता ब्राझीलशी स्पर्धा...

गायकवाड Shekhar Gaikawad म्हणाले, राज्यात ऊस Sugarcane उत्पादन वाढले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात West maharashtra 15 एप्रिलपर्यंत तर विदर्भVidharbha, मराठवाड्यात Marathwada विशेषतः लातूरLatur, उस्मानाबाद Usmanabad जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत गाळप करावे लागेल.
Shekhar Gaikawad, Suresh Bhosale
Shekhar Gaikawad, Suresh Bhosalekarad reporter
Published on
Updated on

रेठरे बुद्रुक : देशात यंदा सर्वाधिक साखर उत्पादन झाले. इथेनॉल निर्मितीही दहा टक्क्यांवर पोचली आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी आहे. महाराष्ट्राची आता ऊस, इथेनॉल उत्पादनात ब्राझीलशी स्पर्धा होणार असुन ती राज्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.

कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्यात उत्पादीत 13 लाखांवरील साखर पोती पूजनप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, बाजीराव निकम, बाबासाहेब शिंदे, संभाजीराव पाटील, वसंतराव शिंदे, जे. डी. मोरे, विलास भंडारे, श्रीरंग देसाई, शिवाजी पाटील, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, रोहिणी शिंदे, सरपंच सुवर्णा कापूरकर, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पवार, साखर कामगार संघ अध्यक्ष एम. के. कापूरकर उपस्थित होते.

Shekhar Gaikawad, Suresh Bhosale
तेलंगणातच टीआरएसची दुरावस्था, पुढच्यावेळी तिथे भाजपच एक नंबरचा पक्ष ठरेल..

श्री. गायकवाड म्हणाले, राज्यात ऊस उत्पादन वाढले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत तर विदर्भ, मराठवाड्यात विशेषतः लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत गाळप करावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रातही कारखाने एप्रिलनंतरही सुरू राहतील. जागतिक बाजारपेठेत विक्री वाढली असल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.

Shekhar Gaikawad, Suresh Bhosale
शेखर गायकवाड, श्रावण हर्डीकर, रुबल अग्रवाल यांचे काम उत्तम!

डॉ. भोसले यांनी कृष्णा कारखाना सभासद हिताचे उपक्रम राबवत असतो, असे सांगुन चांगल्या ऊस दराबरोबरच मोफत साखर, स्मार्ट कार्ड, मोबाईलवर ऊस नोंदी सर्वप्रथम कृष्णा कारखान्यात झाल्या. मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. दळवी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष जगताप यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com