तेलंगणातच टीआरएसची दुरावस्था, पुढच्यावेळी तिथे भाजपच एक नंबरचा पक्ष ठरेल..

राणे, त्यांच्या मुलांवर काय कारवाई झाली? किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होतोय, रवी राणाच्या बाबतीत काय सुरू आहे? हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय. (devendra fadnavis)
devendra fadnavis
devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतो यात मला काही वावंग वाटत नाही. (Bjp) मी मुख्यमंत्री असतांना देखील ते येऊन भेटले होते. राहिला प्रश्न भाजपविरोधी आघाडीची महाराष्ट्रातून सुरूवात होण्याचा तर हा प्रयोग याआधीच्या लोकसभा निवडणुकीत देखील झाला होता. (Devendra Fadanvis) अगदी सगळ्या राजकीय पक्षांचे नेते हातात हात घालून एकत्र आले होते. (Maharashtra) उत्तर प्रदेशात व देशाच्या अनेक राज्यात असे प्रयोग झाले पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

उलट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची त्यांच्याच राज्यात दुरावस्था आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तेलंगणात चार खासदार निवडून आले होते, येणाऱ्या निवडणुकीत भाजप तिथे एक नंबरचा पक्ष ठरेल, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी बाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हा दावा केला.

फडणवीस म्हणाले, भाजप विरोधी आघाडीचे अनेक प्रयोग यापुर्वी झाले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे दोन राज्यांचे मुख्यमंत्री एकमेकांना भेटले याच दृष्टीने आम्ही या भेटीकडे पाहतो. राज्यात सत्ताधारी पक्षाकडून सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाई संदर्भात ते न्यायालयात दाद मागतील. रोज काय होतयं हे सगळे उघड्या डोळ्याने पाहत आहेत.

devendra fadnavis
उस्मानाबाद जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; भाजपचे खातेही उघडले नाही..

राणे, त्यांच्या मुलांवर काय कारवाई झाली? किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होतोय, रवी राणाच्या बाबतीत काय सुरू आहे? हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय. सरकारची निराशा अशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येत आहे, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com