Ramdas Athawale on Pankaja Munde : पंकजा मुंडे बीआएस मध्ये जाणार ? आठवले म्हणतात, 'त्या नाराज..'

Maharashtra Politics : कोणताही नवीन पक्ष राज्यात आल्यानंतर त्यामध्ये इतर पक्षातील काही नाराज नेते इकडून तिकडे होत असतात.
Pankaja Munde, Ramdas Athawale
Pankaja Munde, Ramdas Athawale Sarkarnama

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनीही अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीनं चर्चेला उधाण आलं होतं.आता पंकजा या बीआरएसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे यांना बीआरएस या पक्षा कडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी पक्ष करावा असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांना विचारला असता त्यांनी कोणताही नवीन पक्ष राज्यात आल्यानंतर त्यामध्ये इतर पक्षातील काही नाराज नेते इकडून तिकडे होत असतात. मात्र पंकजा मुंडे या नाराज नसून त्या बीआरएस पक्षांमध्ये प्रवेश करणार नाहीत असा आठवले यांनी म्हटलं आहे.

Pankaja Munde, Ramdas Athawale
Sharad Pawar on Eknath Shinde : "कुठं गटार तुंबलं.." शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोमणा

अन्य राज्यातील पक्ष राज्यात आला की काही नाराज नेते इकडून तिकडे होत असतात. मात्र पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या नाराज नसून त्या के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीत असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

आठवले म्हणाले, "मोठमोठे कटआउट लावून मुख्यमंत्री पद मिळवता येत नाही किंवा त्या राज्यातील सत्ता मिळवता येत नाही. असे असेल तर आम्हीही उद्या तेलंगणात जाऊन मोठमोठे कटआउट लावून मुख्यमंत्री पदाची ऑफर तेथील नेत्यांना देऊ शकतो. मात्र असं होत नसतं. बीआरएस पक्षाला महाराष्ट्रामध्ये यश मिळणार नाही. काही नाराज नेते जरूर इकडून तिकडे होतील. मात्र आम्हाला(एनडीए) त्याची कोणतीही भीती नाही,"

"पंकजा मुंडे यांना 2019 च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्या आमदार नसल्यामुळेच त्यांना मंत्री करता आलेले नाही. त्या आमदार असत्या तर निश्चितपणे त्यांना मंत्रिपदाची संधी होती. त्या नाराज अजिबात नाही. के चंद्रशेखर राव यांनी कितीही आवाहन केले असलं तरीही पंकजा मुंडे या बीआरएस या पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीत," असे आठवले म्हणाले.

Pankaja Munde, Ramdas Athawale
Ram Shinde News : बारामतीकरांना कुणाची भाषा समजली ? सीतारामन की सिद्धरामय्या यांची ; राम शिंदेंचा खोचक सवाल

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र आल्याचं पहायला मिळालं, आणि आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी थेट पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com