Ram Shinde News : बारामतीकरांना कुणाची भाषा समजली ? सीतारामन की सिद्धरामय्या यांची ; राम शिंदेंचा खोचक सवाल

BJP News : काही महिन्यापूर्वी निर्मला सीताराम यांनी बारामतीचा दौरा केला.
Ram Shinde
Ram Shinde Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar: बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गड आहे. या मतदारसंघाला खिंडार पाडण्यासाठी भाजपनं चंग बाधला आहे. वर्षभरापासून बारामती मतदार संघात भाजपने लक्ष घातलं आहे. बारामती जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर बारामती लोकसभा निवडणूक प्रभारी म्हणून आमदार राम शिंदे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.

काही महिन्यापूर्वी निर्मला सीताराम यांनी बारामतीचा दौरा केला. तेव्हा त्यांच्या सभा-मेळावे, भाषणां बाबत मध्यंतरी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी, प्रत्येक पक्षाला देशात कुठेही जाऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. बारामतीमध्ये असो पुरंदर असो त्यांचे भाषणे, विचार बारामतीकरांना सहज समजतील, अशी मार्मिक उपरोधिक टिप्पणी केली होती.

Ram Shinde
Ashish Shelars ON Aditya Thackeray : 'मातोश्री' बाहेर डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे पावसावर बोलणार ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात केलेल्या भाषणा संदर्भ देत शिंदेंनी पवारांना टोमणा मारला आहे. निर्मला सीतारमण यांच्या भाषणावर पवारांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीची आठवण करुन देते राम शिंदेंनी पवारांना चिमटा घेतला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणुक लक्षवेधी ठरणार आहे. निवडणुकीच्या प्रचारातून पवार कुटुंबाला बारामतीमध्येच अडकवून ठेवण्याचा प्रयत्न भाजपचा दिसून येत आहे. त्यासाठी निर्मला सीतारामन, राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांना बारामतीच्या मैदानात उतरवले आहे. ते बारामतीत राष्ट्रवादी कसा शह देणार, काय रणनीती आखणार हे येत्या काही दिवसातच समजेल.

Ram Shinde
Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांच्या पाहुणचारासाठी केळीचे लाडू, बिस्कीट अन् चिप्स ! ; केळीच्या उपपदार्थांना विशेष दर्जा..

काँग्रेसचा पारंपरिक गड असलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघात विशेष लक्ष घालून भाजपने येथून सोनिया गांधी यांना पराभूत केले त्याच धर्तीवर बारामती मधून खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. निर्मला सितारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. त्यांनी मतदारसंघात अनेक ठिकाणी सभा, मेळावे घेतले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com