Mahayuti Politics : 'आता घड्याळाची वेळ चांगली नाही, इकडे तिकडे बघू नका...'; शिवेंद्रराजेंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला डिवचलं

Shivendraraje Bhosale on NCP : भाजप आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये नीधी वाटपावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे असल्या तरी तिजोरीचा मालक आमचा आहे, असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केलं होतं. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.
Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale addresses a rally during local body election campaigning, hinting at rising BJP–NCP tensionsSarkarnama
Published on
Updated on

Satara News, 28 Nov : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून सर्वपक्षीय नेत्यांना प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. शिवाय राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीती मित्रपक्ष देखील या निवडणुकीत एकमेकांविरोधात मैदानात उतरले आहेत.

त्यामुळे राज्यात सत्तेत एकत्र असलेले मित्रपक्ष आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता भाजप नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवाला उद्देशून आता घड्याळाची वेळ चांगली नाही असं वक्तव्य केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवेंद्रराजे रहिमतपूर नगरपालिकेच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, 'आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही त्यामुळे इकडे तिकडे बघू नका. हातातलं घड्याळ वेगळं आणि चिन्हाचे वेगळं आहे.

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
BJP vs Shivsena : '2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे,' म्हणणाऱ्या रवींद्र चव्हाणांना शिंदेंचं प्रत्युत्तर म्हणाले; 'केंद्रात आणि राज्यात...'

सर्वांनी विचार करा आणि भाजपचे उमेदवार निवडून द्या', असं म्हणत त्यांनी भाजप उमेदवारांना मतदान करा असं आवाहन देखील केलं. मात्र, आता शिवेंद्रराजे भोसलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नवा वाद सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ajit Pawar, Shivendraraje Bhosale
Ashish Deshmukh : 'हे फडणवीसांचं सरकार, गृहमंत्री नागपुरचा जास्त वळवळ केली तर तुला..., भरसभेतून भाजप आमदाराची विरोधकांना कापून काढण्याची धमकी

कारण आधीच भाजप आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये नीधी वाटपावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे असल्या तरी तिजोरीचा मालक आमचा आहे, असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केलं होतं. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. अशातच आता शिवेंद्रराजेंनी घड्याळाची वेळ चांगली नसल्याचं वक्तव्य केल्यामुळे अनेक तर्त-वितर्क लावले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com