Khandesh APMC elections : गावित, गिरीष महाजनांची प्रतिष्ठा पणाला!

अनेक बाजार समित्यांत महाआघाडीपुढे भाजपचे आव्हान
Girish Mahajan & Vijaykumar Gavit
Girish Mahajan & Vijaykumar GavitSarkarnama

BJP under pressure in APMC election : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. राज्यात सर्वत्र त्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. २२ बाजार समित्यांसाठी अखेरच्या दिवशी ३ हजार ५८७ जणांनी अर्ज दाखल केले. त्यात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीने भाजपला आव्हान दिले आहे. (All party 3587 candidates file a nomination for APMC election in Khandesh)

खानदेशातील (Khandesh) जळगाव, (Jalgaon) धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) या तिन्ही जिल्ह्यांत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचे तीन मंत्री आहेत. दुसरीकडे बाजार समित्यांत मात्र दोन्ही काँग्रेसचे (Congress) वर्चस्व आहे. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी आघाडीचे पॅनेल करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उमेदवारांची भाऊगर्दी आहेत. त्यात महाविकास आघाडीला भाजपचे (BJP) कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.

Girish Mahajan & Vijaykumar Gavit
APMC election News : महाविकास आघाडीच्या पॅनेलच्या घोषणेने भाजप दबावात!

जळगावात सर्वाधिक अर्ज

जळगाव जिल्ह्यात बारा बाजार समित्यांच्या एकुण २१६ जागांसाठी २ हजार ३७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात माजी सभापती कैलास चौधरी, लकी टेलर, प्रभाकर सोनवणे, सुनील महाजन यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी दुपारी तीनला संपली. या अर्जांची बुधवारी (ता. ५) छाननी होईल. नंतर २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असेल.

धुळ्यात ७२९ इच्छुक

धुळे जिल्ह्यात चार बाजार समित्यांमधील ७२ जागांसाठी एकूण ७२९ इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. धुळे बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३२०, शिरपूरला ६१, दोडाईचा येथे २१५ व साक्री बाजार समितीसाठी १३३ जणांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, धुळे बाजार समिती आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियंत्रणात राहिली आहे; परंतु केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने ही निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Girish Mahajan & Vijaykumar Gavit
Donald Trump News : कोर्टाच्या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, 'हे षडयंत्र..; मी थांबणार नाही...'

नंदुरबार जिल्ह्यात चुरस

नंदुरबार : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. सोमवारी शिवसेना शिंदे गटासह भाजप व अपक्षांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. भाजपतर्फे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सहाही समित्यांमध्ये अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

खासदार डॉ. हीना गावित यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी अर्ज दाखल केले. या वेळी त्यांच्यासोबत व्यापारी, तसेच युवा नेते डॉ. विक्रांत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी उपनिबंधक भारती ठाकूर यांच्याकडे अर्ज दाखल केले. नंदुरबार बाजार समितीसाठी ९३, शहादा- १८२, तळोदा- ८६, नवापूर- ६६, अक्कलकुवा- ३८ आणि धडगाव- ३७ असे प्रत्येकी १८ जागांसाठी एकूण ५०२ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, अक्कलकुवा ३८ बाजार समितीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com