पिचड विरुद्ध महाविकास आघाडी लढत रंगणार : अगस्ती कारखाना निवडणूक

माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते आता ते भाजपमध्ये आहेत.
Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi, Agasti Karkhana news
Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi, Agasti Karkhana newsSarkarnama
Published on
Updated on

अकोले - राज्यातील माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते, आता ते भाजपमध्ये आहेत. त्यांनी देशातील आदिवासींचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत मांडला होता. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांचे चिरंजिव माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून पिचड पिता-पूत्रांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ( Mahavikas Aghadi will play against Pitchad: Agastya factory election )

विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांना राष्ट्रवादीच्या डॉ. किरण लहामटे यांनी पराभूत केले. तर पिचड पिता-पुत्रांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अकोले नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून दिली. आता हा भाजप-राष्ट्रवादी संघर्षाचे रूप पिचडांची सत्ता असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही दिसून येत आहे.(Ahmednagar News in Marathi)

Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi, Agasti Karkhana news
मधुकरराव पिचड म्हणाले, ‘अगस्ती’ वाचवायचा, की टोळीकडे द्यायचा?

कारखान्याची निवडणूक प्रक्रिया लागताच ही निवडणूक तिरंगी होईल असे वाटत होते. मात्र शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक दुरंगी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पिचड विरुद्ध महाविकास आघाडी असे स्वरुप प्राप्त झाले आहे. पिचडांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते आमदार किरण लहामटे, सीताराम गायकर, अशोक भांगरे, काँग्रेसचे मधुकर नवले यांच्या सह शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. मात्र मधुकरराव पिचड हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांची अनेक वर्षांपासून या कारखान्यावर सत्ता आहे. ते आता नेमकी कोणती खेळी खेळतात यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे शेतकरी विकास मंडळ व जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर यांचे शेतकरी समृद्धी मंडळ यांच्यात सरळ लढत होणार आहे. परिवर्तन विकास मंडळाचे दशरथ सावंत यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याने, दुरंगी लढतीचे चित्र दुपारी तीन वाजता स्पष्ट झाले. (Madhukarrao Pichad News)

Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi, Agasti Karkhana news
पिचडांच्या आवाहनला महाविकास आघाडीकडून केराची टोपली : 'अगस्ती'ची निवडणूक रंगणार

अगस्ती कारखान्याच्या 2022-27 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळ निवडणुकीत आज माघारीच्या दिवशी 21 जागांसाठी 49 उमेदवारांनी अर्ज कायम ठेवले. 239 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.

पिचड यांच्या मंडळाचे उमेदवार गटनिहाय असे ः अकोले गट (सर्वसाधारण उत्पादक, व्यक्ती) ः शेतकरी विकास मंडळ- माणिक देशमुख, रामनाथ वाकचौरे, संदीप शेटे. समृद्धी विकास मंडळ - कैलास वाकचौरे, विक्रम नवले, मच्छिंद्र धुमाळ.

इंदोरी गट (सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती) ः शेतकरी विकास मंडळ - वैभव पिचड, प्रकाश नवले, रघुनाथ खरात. समृद्धी विकास मंडळ - अशोक देशमुख, पाटील बुवा सावंत, प्रदीप हासे. आगार गट (सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती ) शेतकरी विकास मंडळ - कोटकर सुनील सुकदेव, शेटे किसन रावजी, आरोटे सुधाकर काशिनाथ, समृद्धी विकास मंडळ - पर्बत नाईकवाडी, विकास शेटे, अशोक आरोटे.

देवठाण गट (सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती) ः शेतकरी विकास मंडळ - वाकचौरे भाऊसाहेब नामदेव, उगले बाबासाहेब बाळासाहेब, वाकचौरे जालिंदर वामन. समृद्धी विकास मंडळ - सुधीर शेळके, रामनाथ बापू वाकचौरे, बादशहा बोंबले.

कोतूळ (सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती) ः शेतकरी विकास मंडळ - देशमुख राजेंद्र नानासाहेब, शेळके रावसाहेब तुकाराम, सावंत बाळासाहेब गणपत. समृद्धी विकास मंडळ - यमाजी लहामटे, मनोज देशमुख, कैलास शेळके. इतर मागासवर्गीय मतदार संघ - वडजे बाळासाहेब काशिनाथ. समृद्धी विकास मंडळ मीनानाथ पांडे. महिला राखीव प्रतिनिधी - शेतकरी विकास मंडळ - मालुंजकर आरती नानासाहेब, नाईकवाडी रंजना भाऊसाहेब. समृद्धी विकास मंडळ - सुलोचना नवले, कांताबाई देशमुख. अनुसूचित जमाती शेतकरी विकास - मधुकर काशिनाथ पिचड. समृद्धी विकास मंडळ - अशोक यशवंत भांगरे. भटक्या विमुक्त जाती जमाती- शेतकरी विकास -काकड सुभाष बंडू. समृद्धी विकास मंडळ - सचिन दराडे. बिगर उत्पादक पणन सेवा संस्था प्रतिनिधी ः शेतकरी विकास मंडळ - डावरे राजेंद्र दत्तू, समृद्धी विकास मंडळ - सीताराम कोंडाजी गायकर.

Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi, Agasti Karkhana news
`अगस्ती`च्या चार संचालकांचे एका महिलेसोबत चाळे : ZP च्या माजी सदस्याचा आरोप

देवेंद्र फडणवीस पिचडांच्या पाठीशी खंबीर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी मधुकरराव पिचड यांना फोन करून निवडणूक व प्रचाराबाबत माहिती घेतली. तसेच संपर्कात राहण्यास सांगितले. या निवडणुकीवर देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देण्यास सुरवात केली असल्याने या निवडणुकीत आणखी राजकीय रंग भरला गेला आहे.

पिचड-भांगरे व गायकर मामा-भाच्यात लढत

दशरथ सावंत आपल्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेत संताप व्यक्त करताना म्हणाले, की शेतकरी विकास, शेतकरी समृद्धी मंडळाने नियोजन करून हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी राजकारण केले आहे. आमच्यासोबत असणारे समृद्धी मंडळाला जाऊन मिळाले. ऊसउत्पादक मतदार शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. कारखाना भंगार झाला तरी हे लोक लिलाव करून त्यातही भ्रष्टाचार करतील, अशी टीका समृद्धी मंडळावर त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com